टेरेसवरून घरात घुसला, लाखोंचे दागिने पळवले, त्या चोराच्या कशा आवळल्या मुसक्या ?

आरोपी हरिओम उर्फ भडकू शिवकुमार विश्वकर्मा हा सराईत चोरटा असून याआधीही त्याने असे अनेक गुन्हे केले आहेत. त्याने गोराई येथे राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरात चोरी केली होती. त्यासाठी तो त्या बिल्डींगच्या टेरेसवर चढला आणि तेथूनच त्याने घरात प्रवेश केला.

टेरेसवरून घरात घुसला, लाखोंचे दागिने पळवले, त्या चोराच्या कशा आवळल्या मुसक्या ?
Follow us
| Updated on: Dec 21, 2024 | 2:08 PM

घराच्या छतावर चढून तेथून घरात घुसून चोरी करणाऱ्या, लाखोंचे दागिने चोरणाऱ्या एक भामट्या चोराला अखेर पोलिसांनी इंगा दाखवत अटक केली आहे. टेरेसवरून घरात घुसत 7 लाखांचे दागिने चोरी करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या.  सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी त्या चोराच्या मुसक्या आवळल्य आणि त्याच्याकडून 140 ग्रॅमचे दागिनेही जप्त केले. हरिओम उर्फ भडकू शिवकुमार विश्वकर्मा (30) असे आरोपीचे नाव असून बोरिवली पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हरिओम उर्फ भडकू शिवकुमार विश्वकर्मा हा सराईत चोरटा असून याआधीही त्याने असे अनेक गुन्हे केले आहेत. त्याने गोराई येथे राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरात चोरी केली होती. त्यासाठी तो त्या बिल्डींगच्या टेरेसवर चढला आणि तेथूनच त्याने घरात प्रवेश केला. त्यांच्या कपाटात ठेवलेले सुमारे 7 लाख रुपयांचे (140 ग्राम दागिने) आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून त्या चोरट्याने तेथून पळ काढला. ही चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित कुटुंबाने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

त्यानंतर बोरिवली पोलिसांनी तपास सुरू केला. त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही त्यांनी तपासले असता आरोपी हरिओम हा चोरी करून निघून जाताना एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे दिसले. तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रायगड जिल्ह्यातून आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीचे 140 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. आरोपींविरुद्ध बोरीवली पोलीस ठाण्यात तीन तर चारकोप पोलीस ठाण्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.