Dombivli Crime : मन गोठवणारी घटना… मिठाईतून गुंगीचं औषध देत अल्पवयीन मुलीवर निर्घृण अत्याचार, नराधमाला यूपीमधून अटक

डोंबिवलीतील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणी उत्तर प्रदेशातून आरोपी संदीप कुमारला अटक करण्यात आली आहे. आरोपीने मिठाईत गुंगीचे औषध देऊन मुलीवर अत्याचार केला होता. गुन्हा घडल्यानंतर तो उत्तर प्रदेशात पळून गेला होता, परंतु पोलिसांच्या शोध मोहिमेमुळे त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.

Dombivli Crime : मन गोठवणारी घटना... मिठाईतून गुंगीचं औषध देत अल्पवयीन मुलीवर निर्घृण अत्याचार, नराधमाला यूपीमधून अटक
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 3:08 PM

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील महिला व मुली, तरूणींवरील अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढल्या असून काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार रून तिची हत्या करण्यात आली होतीय त्यानंतर आरोपीने त्याच्या पत्नीच्या मदतीने तिचा मृतदेह फेकून दिला आणि तो परगावी पळून गेला. ही घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीतही असाच एक निर्घृण गुन्हा घडला आहे. एक नराधमाने अल्पवयीन मुलीला मिठाईतून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्या राहत्या घरातच तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो नराधम आरोपी फरार झाला, गुन्हा दाखल झाल्यावरही तो बराच काळ पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने थेट उत्तर प्रदेशमध्ये धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्याचा कसून शोध घेत अखेर त्याला इत्तर प्रदेश राज्यातील सिद्धार्थ नगर जिल्ह्यातून बेड्या ठोकत अटक केली. संदीप कुमार (वय ३२, रा. डोंबिवली) असे यूपीतून अटक केलेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस व मानपाडा पोलीस यांनी एकत्र मिळून सापळा रचत यूपीतून आरोपीला बेड्या ठोकल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी डोंबिवली पूर्वेतील एका वस्तीत कुटूंबासह राहते, ती भंगार गोळा करण्याचे काम करत होती. तर नराधम संदीप कुमार हाही भंगा गोळा करण्याचा व्यवसाय करून तो त्या पीडित अल्पवीयन मुलीच्या घरीच राहात होता. मात्र जानेवारी 2022 मध्ये नराधमाची वाईट नजर त्या पीडित मुलीवर पडली होती. तेव्हापासून तो तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पीडित मुलगी त्याला विरोध करीत होती.

असा साधला डाव

मात्र ऑक्टोबर 2024मध्ये त्या आरोपीने डाव साधला. आरोपी संदीप कुमार याने एका बहाण्याने त्या मुलीला मिठाई खायला दिली, पण त्याने त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलं होतं. ती मिठाई खाल्ल्यावर ती मुलगी बेशु्द्ध झाली आणि त्याचाच फायदा घेत आरोपी संदीपने त्या मुलीच्या घरातच तिच्यार अमानुषपणे अत्याचार केला आणि तो पसार आला. पीडित मुलीने पालकांना हे सांगितलं आणि त्यांनी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रा दाखल केली. त्या आधारे पोलिसांन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

मात्र गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण नराधमाला लागताच तो उत्तरप्रदेश मधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील त्याच्या मूळगावी पळून गेला होता. तेव्हापासून मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत होते. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा उत्तर प्रदेश राज्यातील सिद्धार्थनगर जिल्हातील कपिलवास्तु येथील एका गावात लपला असल्याची मानपाडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी युपी मधील गोरखपूर येथील एस.टी एफ पथकाला त्या नराधमाच्या गुन्ह्याची माहिती दिली. अखेर या पोलीस पथकाने 4 जानेवारी 2025 रोजी यूपीमधील ग्राम मरवटीया कुर्मी गावाच्या हद्दीत सापळा रचून आरोपी संदीपला ताब्यात घेतले. त्यानंतर कपिलवास्तु पोलीस ठाण्यात त्याला ताब्यात घेतल्याची माहिती नोंद करून ६ जानेवारी रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीला मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.