पोलीसच निघाले खंडणीखोर, महिन्याला मागितली तब्बल एवढी रक्कम, आता जेलची हवा

या प्रकरणात पोलीसच खंडणीखोर (Ransom) निघालेत. यात एका व्यवसायिकांने पत्र लिहून तक्रार केल्याने या पोलिसांचा भंडाफोड झाला आहे. आणि हे प्रकरण आता त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.

पोलीसच निघाले खंडणीखोर, महिन्याला मागितली तब्बल एवढी रक्कम, आता जेलची हवा
कुख्यात गुंड आणि मोक्काच्या आरोपींच्या संपत्तीवर नागपूर पोलिसांची कारवाई
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 3:38 PM

मुंबई : पोलिसांकडे (Police) नेहमी आपण रक्षणकर्ते म्हणून पाहतो. मात्र काही वेळेला हे रक्षकच भक्षक निघाल्याचे दिसून येते. पोलिसांनी लाच घेताना पकडले, निलंबन झाले, छापेमारीत पकडले (Crime) अशा बातम्या सर्सास येतात. असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ माजली आहे. कारण या प्रकरणात पोलीसच खंडणीखोर (Ransom) निघालेत. यात एका व्यवसायिकांने पत्र लिहून तक्रार केल्याने या पोलिसांचा भंडाफोड झाला आहे. आणि हे प्रकरण आता त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. कारण या प्रकरणामुळेच काही अधिकाऱ्यांना आता जेलची हवा खावी लागत आहे. यात अगदी स्थानिक अधिकाऱ्यांपासून ते डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांवर महिन्याला तगडा हाफ्ता मागितल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे पोलीस खात्याची मान पुन्हा शरमेने खाली गेली आहे.

तक्रारीचे पत्र आमच्या हाती

हे एल टी मार्ग पोलीस ठाण्यातील खंडणी प्रकरण आहेत. ज्यात पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर गंभीर आरोप करणारे अंगाडीया यांचे पत्र टीव्ही 9 च्या हाती लागले आहे. या पत्रात डीसीपी सौरभ त्रिपाठी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याच पत्राचा आधार घेत तीन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन पोलीस अधिकाऱ्यांना यात अटक झालीय तर पीआय ओम वंगाते हे फरार आहेत. अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी या प्रकरणात फिर्याद दिलीय त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला होता. फरार वंगाते यांचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच पोलीस त्यांनाही अटक करण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं पत्रात?

अंगाडीया यांनी तक्रार करताना हे पत्र दिलंय त्यात डीसीपी यांनी त्यांना कसं धमकावलं याचा उल्लेख केलाय. “तुमची जिथपर्यंत ओळख आहे तिथं जावा, मात्र तुम्हाला मला महिन्याला दहा लाख द्यावेच लागतील. आता मी फक्त दोन पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई सुरू केली आहे, माझ्या अंडर जेवढी पोलीस स्टेशन आहेत त्या सर्व पोलीस ठाण्यातून कारवाई करून तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही” अशी धमकी दिल्याचा उल्लेख त्या पत्रात आहे. सौरभ त्रिपाठी यांनी अंगाडीया असोसिएशनकडे महिन्याला 10 लाख देण्याची मागणी केली होती ते न दिल्यामुळे त्यांनी कारवाई सुरू केली. असा आरोप आहे. सौरभ त्रिपाठी यांनी अंगाडीया असोसिएशनचे अध्यक्षांना या टार्गेटबाबत सांगितले होते मात्र त्यांनी तेवढी क्षमता नसल्याचे म्हटल्याने त्रिपाठी यांनी एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या माध्यमातून कारवाई केल्याचं तक्रारीत म्हटलंय. ही तक्रार डिसेंम्बर महिन्यात अंगाडीया असोशिएशनने अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्याकडे केली होती. हे प्रकरण सध्या गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटकडे सोपवण्यात आलंय सीआययूने यात दोन अधिकाऱ्यांना अटक केलीय.

कामावरुन वाद, HR ला रस्त्यात अडवून गाडी फोडली, पुण्यात गंभीर प्रकार

नियतीने तीन लेकरांचा घास घेतला, विषबाधेने दोन बहिणींपाठोपाठ भाऊही दगावला, आई गंभीर

बीडमधील नोंदणी ऑफिसबाहेर गोळीबार, शिवसेना नेत्या पिता-पुत्रावर गुन्हा

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.