दरोड्यात दीड कोटी लुटले, चाकू, खेळण्यातील पिस्तुलाचा वापर, चंद्रपुरात 4 दरोडेखोरांना अखेर बेड्या
शहरात बुधवारी उच्चभ्रू वस्तीत झालेल्या दरोड्याच्या घटनेचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. दरोड्यातील 1 कोटी 73 लाखांची रक्कम पोलिसांनी जप्त केली असून या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आलंय. शहरातल्या अरविंदनगर येथील ठोक अंडेविक्री व्यावसायिक खालिद कोळसावाला यांची घरी हा दरोडा पडला होता.
चंद्रपूर : शहरात बुधवारी उच्चभ्रू वस्तीत पडलेल्या दरोड्याचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. दरोड्यातील 1 कोटी 73 लाखांची रक्कम पोलिसांनी जप्त केली असून या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आलंय. शहरातल्या अरविंदनगर येथील ठोक अंडेविक्री व्यावसायिक खालिद कोळसावाला यांची घरी हा दरोडा पडला होता.
दरोड्यासाठी चाकू आणि खेळण्यातल्या पिस्तुलचा वापर
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी अरविंदनगर येथील ठोक अंडेविक्री व्यवसायिक खालिद कोळसावाला यांच्या घरी दरोडा पडला होता. त्यांच्या घरी 2 वृद्ध महिला असताना चाकू आणि खेळण्यातल्या पिस्तुलचा वापर करत आरोपींनी प्रवेश करत केला होता. घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी दिवाणात लपविलेल्या रोख रकमेच्या पिशव्या घेऊन पळ काढला होता. यावेळी चोरट्यांनी लाखो रुपये चोरले होते.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, खबऱ्यांची मदत घेतली
या घटनेनंतर कोळसावाला यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच खबऱ्यांची मदत घेत पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. आरोपींनी पांढरे चारचाकी वाहन आणि रोख रकमेच्या पिशव्यांची अदलाबदल केल्याचे पोलिसांना तपासात आढळले.
आरोपींना अटक, गुन्ह्याची उकल करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न
त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात नागपुरातून एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह 4 आरोपींना अटक केली आहे. या व्यापाऱ्याकडे एवढी मोठी रक्कम आली कशी? परिवारातील कुणी यात सामील होते का? या प्रश्नांची पोलीस सध्या उकल करत आहेत.
नवी मुंबईत दोन किलो सोने लुटले, दरोडेखोर मोकाट
नवी मुंबईतील घणसोली येथील ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा (Robbery) पडल्याची घटना रविवारी (14 नोव्हेंबर) दुपारी घडली होती. यामध्ये सुमारे दोन किलो सोन्याचे, तर 25 किलो चांदीचे दागिने लुटून नेले होते. घणसोली सेक्टर 7 येथील अंबिका ज्वेलर्समध्ये तीन व्यक्तींनी ज्वेलर्समध्ये प्रवेश करुन पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकला होता मात्र परिसरातील सीसीटीव्हीमध्ये आरोपी सोने-चांदी असलेली बॅग घेऊन जाताना दिसत आहेत. याच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत.
इतर बातम्या :
पोलीस असल्याचं सांगून प्रेमी युगुलाचे फोटो काढले, नंतर प्रियकरासमोरच प्रेयसीवर बलात्कार