दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या चौघांना रंगेहाथ पकडले, शस्त्रास्त्रांसह मुद्देमाल जप्त

दरोडा टाकण्यासाठी टोळके पूर्ण तयारीनिशी शहरात दाखल झाले. शहरात आपले सावज हेरत फिरत असतानाच पोलिसांना याची कुणकुण लागली. पोलीस या टोळक्यासाठी सापळा लावून बसले.

दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या चौघांना रंगेहाथ पकडले, शस्त्रास्त्रांसह मुद्देमाल जप्त
यवतमाळमध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेल्या आरोपींना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 6:13 PM

यवतमाळ / विवेक गावंडे : सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरोडा टाकण्यापूर्वीच पोलिसांनी सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून देशीकट्टा, जिवंत काडतूस, दोन धारदार चाकू, हॉकी स्टिक, स्विफ्ट कार, दुचाकी असा मुद्देमालही जप्त करण्यात आला. अवधूतवाडी पोलिसांनी येथील जाजू चौक परिसरात ही कारवाई केली. मात्र, यावेळी टोळक्याचा एक साथीदार पसार होण्यात यशस्वी झाला. जगदीश रावल, गजानन राठोड, बाबू बडोदे, रोहन गरवारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर देवा वाघमारे असे त्यांच्या पसार झालेल्या साथीदाराचे नाव आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना सापळा रचून आरोपींना पकडले

एका स्विफ्ट कारने पाच जण यवतमाळात एक गंभीर गुन्हेगारी घटना घडवण्यासाठी फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. अवधूतवाडी ठाण्यातील पोलीस कर्मचारी बलराम शुक्ला यांना खबऱ्याकडून ही माहिती मिळाली होती. शुक्ला यांनी ही माहिती अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे यांना दिली. यानंतर पोलीस पथकाने परिसरात सापळा रचला.

एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी

पोलिसांनी जाजू चौकात ते वाहन पकडले आणि संबंधित चौघांना शिताफिने ताब्यात घेतले. त्यानंतर त्या चौघांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे देशीकट्टा, जीवंत काडतूस, दोन धारदार चाकू, हॉकी स्टिक अशा शस्त्रांसह मुद्देमाल आढळून आला. शिवाय, त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार आणि दुचाकीही जप्त करण्यात आली. मात्र, यावेळी देवा वाघमारे हा टोळक्याचा साथीदार पसार होण्यात यशस्वी झाला. त्या चौघांना ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.