सव्वा किलो सोन्याचे दागिने घेऊन पळाला, महिन्याभरापासून पोलिसांना गुंगारा… अखेर चोरट्याला राजस्थानातून अटक

मुंबईत सध्या चोऱ्या-माऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. असंच एक चोरीचं प्रकरण समोर आलं जिथे एका इसमाने तब्बल सव्वा किलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केले आणि तो फरार झाला. संपूर्ण महिनाभर तो चलाख चोर पोलिसांना गुंगारा देत होता.

सव्वा किलो सोन्याचे दागिने घेऊन पळाला, महिन्याभरापासून पोलिसांना गुंगारा... अखेर चोरट्याला राजस्थानातून अटक
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 12:15 PM

मुंबई | 20 मार्च 2024 : मुंबईत सध्या चोऱ्या-माऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आणि हे गुन्हेगार खूप चलाखही असतात. असंच एक चोरीचं प्रकरण समोर आलं जिथे एका इसमाने तब्बल सव्वा किलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केले आणि तो फरार झाला. संपूर्ण महिनाभर तो चलाख चोर पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र पोलिसांनी अथक तपास करत त्या आरोपीला थेट राजस्थानमधून अटक केली. कानाराम उर्फ प्रवीण जाट असे आरोपीचे नाव असून तो महिन्याभरापासून पोलिसांना चुकवत फिरत होता. मात्र अखेर तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला. पोलिसांनी त्याच्याकडून लाखो रुपये किमतीचे दागिने ताब्यात घेतले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरीची ही घटना लालबागमध्ये घडली. जितेंद्र परमाशंकर मिश्रा यांचा लालबागमधील नारायण उद्योग भवनमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करण्याचा व्यवसाय आहे. आरोपी कानाराम उर्फ प्रवीण जाट हा त्यांच्या दुकानात काम करत होती. मात्र एक दिवस त्याची नियत फिरली. 10 फेब्रुवारी रोजी त्याने मिश्रा यांच्या दुकानातून तब्बल 1125 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले आणि त्याने तेथून पळ काढला. चोरी करून तो पसार झाला. याप्रकरणी मिश्रा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानंतर काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळ व आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. तेव्हा आरोपीने मोबाइलमधील सीमकार्ड फेकून दिल्याचे, तसेच तो एका टॅक्सीत बसून जात असल्याचे दिसले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टॅक्सी चालकाचा शोध घेऊन त्याच्याकडून आरोपीबाबतची माहिती मिळविली. आरोपी राजस्थानच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर मुंबई पोलिसांनी राजस्थानमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपी मूळचा राजस्थानमधील बाली तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्याकडून सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.