करायला गेला एक अन्… गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी इन्स्टावर टाकले ‘ते’ फोटो, थेट गजाआडच गेला ना भाऊ !
आपल्या एरिआत आपल नाव व्हावं आणि गर्लफ्रेंड नेहमी इंप्रेस व्हावी अशीच तरूणाची इच्छा होती. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याने इन्स्टाग्रामवर त्याचे काही ‘खतरनाक’ फोटो टाकले. पण त्याचे ते फोटो पाहून पोलिसत मागे लागले. असं काय होतं त्या फोटोत ?
आपल्या एरिआत आपली वट असावी, लोकांनी आपल्याला ओळखावं अशी प्रत्येक तरूणाची इच्छा असते. आपल्याला गर्लफ्रेंडवर चांगलं इंप्रेशन पाडायचंय असाही अनेकांचा विचार असतो. या दोन्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तरूण काहीही करू शकतात, एखादी अजब गोष्ट करू शकतात. कोणी जिममध्ये जाऊन बॉडी बनवतं तर कोणी शायरी वगैरे लिहीतात. तर काही तरूण सोशल मीडियावर आपले सॉलिड फोटो टाकून इंप्रेशन पाडण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न 20 वर्षांच्या हर्षने केला, पण तो त्याच्या अंगाशीच आला.
आपल्या एरिआत आपल नाव व्हावं आणि गर्लफ्रेंड नेहमी इंप्रेस व्हावी अशीच दिल्लीतल्या हर्षची इच्छा होती. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याने इन्स्टाग्रामवर त्याचे काही ‘खतरनाक’ फोटो टाकले. पण त्याचे ते फोटो इतर लोकांनी किंवा गर्लफ्रेंडने पाहिले की नाही ते तर माहीत नाही, पण त्याचं नशीब इतकं फुटकं होतं की ते फोटो पोलिसांच्या, एटीएसच्या नजरेस पडले. आणि मग काय एटीएस अधिकारी हात धुवून त्याचा मागे लागले, त्याचा शोध घेऊ लागले.
भररस्त्यात हातात शस्त्र घेऊन फिरत होते तरूण
दिल्लीतल हर्ष या तरूणाने इन्स्टाग्रामवर जे फोटो टाकले, त्यामध्ये त्याचा हातात एक गन ( बंदूक) दिसत होती. त्याच्या हातातलं शस्त्र फक्त अवैधच नव्हतं तर दहशत परसवण्याच्या हेतूनचे ते फोटो पोस्ट करण्यात आल्याचं सप्ष्ट दिसत होतं. ते पाहिल्यानंतर पोलिस त्याच्या मागे लागले. हर्षच्या शोधासाठी निरीक्षक उमेश यादव यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. दरम्यान, आंबेडकरनगर परिसरात दोन तरुण बेकायदेशीर पिस्तुल घेऊन लोकांवर प्रभाव पाडत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तरूणांना पकडून ठोकल्या बेड्या
ही माहिती मिळताच एएटीएसचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. या तरुणांपैकी एक हर्ष हा स्वतः होता, तर दुसरा त्याचा अल्पवयीन मित्र होता. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. या संदर्भात एएटीएसने आंबेडकर नगरमध्ये शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 25, 54 आणि 59 अंतर्गत एफआयआर नोंदवून हर्षला अटक केली आहे. त्याचबरोबर अल्पवयीन व्यक्तीवरही कारवाई करण्यात येत आहे. करायला गेला एक अन् भलतंच घडलं. गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्याच्या नादात तो तरूण थेट गजाआडच पोहोचला.