आईची तब्येत ठीक नाही सांगून निघाली, 8 लाखांचं घड्याळही… अभिनेत्रीच्या घरात काय घडलं ?

मुंबईत गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून गोरेगाव येथे चोरीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अभिनेत्रीच्या घरातून तब्बल 8 लाखांचं महागड घड्याळ चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला.

आईची तब्येत ठीक नाही सांगून निघाली, 8 लाखांचं घड्याळही... अभिनेत्रीच्या घरात काय घडलं ?
पिंपरी चिंचवडमध्ये लॉजमध्ये हत्याकांड
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 9:18 AM

मुंबईत गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून गोरेगाव येथे चोरीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अभिनेत्रीच्या घरातून तब्बल 8 लाखांचं महागड घड्याळ चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला. अखेर गोरेगाव पोलिसांनी ही चोरी करणाऱ्या मोलकरणीला अटक केली. संगीता बर्मन ( वय 26) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिने अभिनेत्रीच्या घरातून 8 लाखाचे महागडे घड्याळ चोरल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रुही सिंह गोरेगाव येथील रहिवासी आहे. 12 ऑक्टोबरला तिचा वाढदिवस असतो. गेल्या वर्षी ( 2023) तिच्या एका मित्राने तिने रोलेक्स कंपनीचे 8 लाख रुपयांचे महागडे घड्याळ गिफ्ट म्हणून दिलं होतं. तर संगीता ही महिला फेब्रुवारी 2024 पासून तिच्याकडे कामाला लागली होती. ती मूळची मध्यप्रदेशातील जबलपूरची रहिवासी आहे. एका प्रायव्हेट संस्थेमार्फत ती रुहीकडे घरकामासाठी रुजू झाली होती.

आई आजारी आहे सांगितलं आणि घराबाहेर पडली पण…

अभिनेतेत्री रुही हिला 27 फेब्रुवारी रोजी एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तिने हातात रोलेक्स कंपनीचे घड्याळ घातले होते. घरी आल्यानंतर तिने ते घड्याळ कपाटात काढून ठेवलं. मात्र 14 मार्च रोजी संगीता घरात काम करत असताना काहीतरी लपवत संशयास्पद हालचाल करत असल्याचं रुहीला दिसलं. तिने संगीताला याबद्दल जाब विचारला असता ती खूप घाबरली. उडवाउडवीची उत्तरं देत आपण सफाई करत असल्याचं तिने सांगितलं.

मात्र रूहीला तिच्या वागण्याचा संशय आला होता. त्याच दिवशी काम केल्यावर तास-दोन तासांतच संगीताने रुहीला सांगितलं की माझी आई आजारी आहे, मला तातडीने गावाला जायचं आहे.  त्यानंतर संगीता दुपारी लगेच बॅग घेऊन बाहेर पडली.

काही दिवसांनी रुहीला एका कार्यक्रमासाठी बाहे जायचं होतं, म्हणून तिने हातात घड्याळ घालण्यासाठी कपाट उघडलं पण ते कुठेच सापडलं नाही. बरीच शोधाशोध करूनही घड्याळ मिळालंच नाही. अखेर संगीतनेच साफसफाई करताना ते घड्याळ चोरल्याचा रुहीला संशय आला. तिने गोरगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत चोरीची तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन संगीताचा शोध सुरु केला होता. ती तिच्या गावी जबलपूर येथे गेली असू शकते असा अंदाज व्यक्त करत पोलिसांचे पथक तिथेही गेलं.

अखेर तब्बल 5 महिन्यांनी संगीताला शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळालं. तिच्या गावातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. आपणच ते घड्याळ चोरल्याचं तिने चौकशीत कबूल केले. पोलिसांनी तिला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणलं असून पुढील कारवाई सुरू आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.