फक्त तिचा हात हातात घेण्यासाठी पैसे मोजावे लागायचे, तरुणांच्या रांगा लागायच्या; सत्य उलगडताच पोलीसही चक्रावले
एक महिलेचा हात हातात घेण्यासाठी तरुणांच्या रांगा लागायच्या. पोलिसांनी या महिलेचे सत्य उघड करुन तिच्या एका साथीदाराला अटक केली आहे.

एक महिलेची क्रेझ देशातील काही ठिकाणी पाहायला मिळाली. या महिलेची एक झलक पाहण्यासाठी संध्याकाळी तरुणांची गर्दी होत असे. काही तरुणांना या महिलेला पाहण्याची संधी मिळत असत तर काहींना तिच्याशी हात मिळवण्याची. पण या महिलेने कोणत्याही पुरुषाशी फुकट हात मिळवणी केली नाही. उलट एखाद्या पुरुषाचा हात हातात घेण्यासाठी ही महिला लाखो रुपये घेत असे. एका हातावर पैसे ठेवा आणि दुसरा हात काही वेळासाठी हातात घ्या असे या महिलेचे धोरण होते. आता ही महिला नेमकं काय करायची चला जाणून घेऊया…
ही महिला दररोज पुरुषांना भेटून हात हातात घेण्यासाठी पैसे घेत असत. एक दिवस पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर या महिलेचे जे सत्य समोर आले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. खरं तर हे प्रकरण एका वंदना नावाच्या माहिलेशी संबंधीत आहे. ती दिल्लीतील नंद नगरीमधील सामान्य महिला आहे. २०१५मध्ये तिने आयुष्यातील एका महत्त्वाच्या वळणावर लग्न केले.
वंदनाने एक नवीन जग निर्माण केले होते
काही महिन्यांमध्येच सुंदर दिसणाऱ्या वंदनाने स्वत:चे जग उभे केले होते. या जगात ती ड्रग्जचा व्यवसाय करत होती. वंदनाचे काम होते की दररोज ड्रग्जच्या पुड्या तयार करुन हात मिळवण्याच्या बहाण्याने समोरच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे. या पुड्या घेण्यासाठी अनेक लोक वंदानाची तासनतास वाट पाहात असत. दरम्यान, पोलिसांना या प्रकरणाची भनक लागली. या पुड्यांच्या बहाण्याने हेरॉईन नावाचे ड्रग्ज लोकांना पुरवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
वंदना कोणत्या भागात फिरायची?
या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी वंदनाला अटक केली. चौकशीदरम्यान वंदनाने पोलिसांना सांगितले की, सचिन नावाच्या व्यक्तीने तिला या रॅकेटमध्ये आणले होते. तो म्हणाला तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे, फक्त तुम्ही या संधीचे सोने करा. सचिनने वंदनाला हेरॉईन विकण्याची ऑफर दिली होती. तसेच यामधून मिळारे पैसे पाहून वंदना सर्व गोष्टी करण्यासाठी तयार झाली. ती सचिनला नकार देऊ शकली नाही. वंदनाने हेरॉईन खरेदी करून नंद नगरी, सुंदर नगरी, डीएलएफ भोपुरा, राजेंद्र नगर या भागात विकण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सचिनलाही अटक केली आहे.