लांब केस आवडत नाही म्हणून कापले तरुणीचे केस ! केस कापणाऱ्या मुंबईतील माथेफिरूला अखेर अटक

मुंबईत फिरणाऱ्या केसकापू माथेफिरूमुळे महिला-मुलींमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. अखेर त्या माथेफिरू इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने ऑगस्ट 2024 मध्येही त्याने एका 40 वर्षीय महिलेचे केस कापल्याचा प्रकार आता समोर आला आहे.

लांब केस आवडत नाही म्हणून कापले तरुणीचे केस ! केस कापणाऱ्या मुंबईतील माथेफिरूला अखेर अटक
महिलांचे केस कापणाऱ्या माथेफिरूला अटक
Follow us
| Updated on: Jan 09, 2025 | 11:34 AM

मुंबईत फिरणाऱ्या केसकापू माथेफिरूमुळे महिला-मुलींमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. अखेर त्या माथेफिरू इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश गायकवाड ( वय 35) असे आरोपीचे नाव असून तो चेंबूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ‘महिलांचे लांब केस आवडत नाहीत, म्हणूनच आपण हे कृत्य केले’ अशी धक्कादायक कबुली या आरोपीने दिली आहे. पोलिसांच्या तपासात हा जबाब त्याने दिला, पोलिस त्याची अधिक चौकशी करत आहेत.

दादर स्टेशनमध्ये माथेफिरूच्या एका कृत्यामुळे खळबळ माजली होती. आरोपी दिनेशने सोमवारी दादर स्टेशनवर कॉलेजला जाणाऱ्या एका तरूणीचे केसच कापले आणि बॅगेत भरून पळ काढला. त्या तरूणीने त्याचा पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दीचा फायदा घेत तो पळून गेला. यामुळे मोठी खळबळ माजली होती. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीनंतर मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी दिशेनचा शोध घेतला आणि अखेर त्याला अटक केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे दादर स्टेशनवर घडलेली ही पहिलीच घटना नव्हती तर यापूर्वीही त्याने अशाच एका महिलेचे केस कापले होते.

आरोपी दिनेशने ऑगस्ट 2024 मध्येही त्याने एका 40 वर्षीय महिलेचे केस कापल्याचा प्रकार आता समोर आला आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने ही कबुली दिली होती. सध्या तो पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपी सामील आहेत का? आणि आतापर्यंत किती महिलांबरोबर असा प्रकार घडला, याचा तपास पोलीस करत आहेत.

काय आहे प्रकरण ?

सोमवारी सकाळी दादर स्टेशनवर धक्कादायक प्रकार घडला. तक्रारदार तरूणी ही कल्याणची रहिवासी असून तो माटुंग्यातील रुपारेल कॉलेजमध्ये शिकते. कॉलेजला जाण्यासाठी सोमवारी सकाळी तिने कल्याणहून 8 च्या सुमारास गाडी पकडली. 9.15 च्या सुमारास ती दादर स्टेशनवर उतरली. दादरच्या ब्रीजवर ती आली असता तिकीट बुकिंग करतात त्या खिडकीजवळ पोहोचली असताना तिला मागच्या बाजूला अचानक काहीतरी टोचल्यासारखे, काहीतरी काटेरी वाटले. तिने अचानक मागे वळून पाहिले असता एक अनोळखी माणूस बॅग घेऊन वेगाने चालत जाताना दिसला. तिने तेवढ्यात खाली पाहिलं असता काही केस खाली पडलेले होते. तिने तिच्या केसांवरून मागून हात फिरवला असता, तिचे केस अर्धव कापले गेल्याचे तिला आढळले. त्यामुे ती घाबरली, मात्र तरीही तिने कशीबशी हिंमत गोळा केली आणि त्या इसमाचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. मात्र गर्दीचा फायदा घेत त्या माथेफिरूने तिथून पटकन पळ काढला आणि गायब झाला.

यानंतर त्या तरूणीने मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेली संपूर्ण घटना सांगत तक्रार दाखल केली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीचा शोध सुरू केला. अखेर दोन दिवसांनी या घटनेतील आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालं.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.