भिकारी महिलेच्या झोपडीत 10 महागडे मोबाईल, पोलीसही अवाक

वसई-विरारमध्ये एका भिकारी महिलेकडे तब्बल 10 ब्रँडेड कंपनीचे महागडे फोन आढळले आहेत.

भिकारी महिलेच्या झोपडीत 10 महागडे मोबाईल, पोलीसही अवाक
Follow us
| Updated on: Oct 24, 2020 | 4:52 PM

वसई-विरार : दररोज भीक मागून गुजराण करणाऱ्या भिकाऱ्यांबाबत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे आढळल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र, वसई-विरारमध्ये एका भिकारी महिलेकडे तब्बल 10 ब्रँडेड कंपनीचे महागडे फोन आढळले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांसह कारवाई करणारे पोलीसही अवाक झाले आहेत. आरोपी भिकारी महिलेच्या अगदी साध्या झोपडीत हे फोन आढळले आहेत. विरार पोलिसांनी या महिलेवर कारवाई केली (Police found 10 expensive mobiles in a beggar woman’s hut in Vasai Virar).

विरारमध्ये भिकारी महिलेच्या झोपडीत चक्क विविध ब्रँडेड कंपनीचे 10 महागडे मोबाईल फोन सापडले आहेत. यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. विरार पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी भिकारी महिलेची झडती घेतली. यावेळी या महिलेकडील महागड्या मोबाईलचं घबाडच पोलिसांच्या हाताला लागलं आहे. विनोदबाई आजागृ सोलंकी असं या भिकारी महिलेचं नाव आहे. या 40 वर्षांच्या भिकारी महिलेकडे इतके मोबाईल आढळल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

विरार पूर्व आर जे नाका परिसरात अनेक भिकारी, गरीब लोक पडीक जागेत झोपड्या करून राहत आहेत. गर्दी, रेल्वेस्थानक परिसर, बाजारपेठा, सिग्नल परिसरात उभे राहून भीक मागण्याच्या बहाण्याने ही भिकारी महिला मोबाईल चोरत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याबाबत भिकारी महिलेच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून विरार पोलिसांनी तिला अटक केलं आहे.

आरोपी भिकारी महिलेला वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या महिलेला 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी अधिकृतपणे कॅमेऱ्यासमोर माहिती देण्यास मात्र नकार दिला आहे.

हेही वाचा :

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 147 तोळे सोन्यासह 25 लाखांचा ऐवज जप्त, विरार पोलिसांची कारवाई

ठेकेदार कंपनी ब्लॅकलिस्ट, अधिकाऱ्यांवरही कारवाई, रस्त्यावरील खड्ड्यांप्रकरणी वसई-विरार आयुक्तांची थेट कारवाई

वसई-विरारमध्ये कामचुकारपणा करणाऱ्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन

Police found 10 expensive mobiles in a beggar woman’s hut in Vasai Virar

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.