अहमदनगरमध्ये दरोडा अन् बीडमध्ये सोन्याची विक्री, दरोडेखोरास बेड्या
भर दिवसा दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल लूटणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आलंय. (police arrested robbers ahmednagar)
अहमदनगर : भर दिवसा दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल लूटणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आलंय. अहमदनगरच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून आतापर्यंत दोघांना बीड जिल्ह्यातील शिरुरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. भगवान भोसले आणि रामा इंगळे असे दोन्ही आरोपींची नावं आहेत. दरोडे टाकल्याचे भगवान भोसले याने कबूल केले आहे. (Police have arrested two robbers in Ahmednagar and seized 14 lakh rupees)
25 तोळे सोने, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, चोरीचे प्रकार वाढले होते. लुटीच्या वाढत्या प्रकरणांमुळे जिल्ह्यातील नागरिकांध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे अहमदनगरचे पोलीस मागील कित्येक दिवसांपासून चोरांच्या शोधात होते. या पार्श्वभूमीवर त्यानंतर भागवान भोसले याने दरोडा टाकून नुकतंच तब्बल 25 तोळे सोने पळवल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली. त्यांनतर सापळा रचत पोलिसांनी आरोपी भगवान भोसले याला बीडमधून अटक केले. यावेळी त्याच्याकडे तब्बल 25 तोळे सोने सापडले. तसेच त्याच्याकडून 14 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चोरी अहमदनगरमध्ये सोन्याच विक्री बीडमध्ये
दरम्यान, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरु केली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपी भगवान भोसले हा आपल्या साथीदारांसह अहमदनगर जिल्ह्यात भर दिवसा तसेच रात्रीसुद्धा घरफोडी करायचा. चोरी केलेला माल तो बीड जिल्ह्यातील रामा इंगळे या व्यक्तीला विकायचा. यावेळी भोसले याने अहमदनगर जिल्ह्यातून सोन्याची चोरी करून ते विकण्यासाठी बीड गाठल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना समजली होती. त्यानंतर कटके यांच्या नेतृत्वात पोलिसांनी भगवान भोसलेसह रामा इंगळे यालासुद्धा अटक केली.
दरम्यान, या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. आरोपी भगवान भोसले याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.
….तर कोहळा, आवळा अन् सगळंच भस्मसात होईल; इंधन दरवाढीवरुन सामना अग्रलेखात केंद्रावर टीकेचे आसूडhttps://t.co/aRIBMnD24H#PetrolPriceHike |#DieselPrice | #ShivSena | @ShivSena | #PetrolDieselPriceHike
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2021
इतर बातम्या :
जादूटोणा करुन तुझ्यावर पैशांचा पाऊस पाडेन, अल्पवयीन मुलीच्या फसवणुकीचा प्रयत्न, पाच जण गजाआड
समलैंगिक संबंधातून क्षुल्लक वाद, पुण्यात मित्राने मित्राला संपवलं
सिगारेट तस्करी रॅकेट उघडकीस, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरपीएफ जवानांची कारवाई
(Police have arrested two robbers in Ahmednagar and seized 14 lakh rupees)