Parbhani Murder : परभणीतील बेपत्ता तरुणाची निर्घृण हत्या, दारुच्या पैशाच्या वादातून हत्या करुन पुरले
शहरातील अजिजिया नगरातील बेकरी समोर रात्री साडे अकराच्या सुमारास मैनोद्दीन या तरुणासमवेत काहींनी वाद घातला असल्याची माहिती पोलिसांना कळाली. तेव्हा कोतवाली पोलिसांनी जलदगतीने हालचाली करीत एका संशयितास ताब्यात घेतले.
परभणी : परभणीतील वीस दिवसांपासून बेपत्ता (Missing) असणार्या तरुणाची हत्या (Murder) झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दारु पिण्याकरीता पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक (Arrest) केले आहे. या घटनेमुळे परभणी शहरात एकच खळबळ माजली आहे. शेख मैनोद्दीन असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर सय्यद मतीन, शेख नदीम, शाहरुख मिर्झा, शाबाज हुसेन आणि सय्यद हुसेन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या पाचही आरोपींविरोधात येथील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे मात्र परभणीत एकच खळबळ माजली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.
मयत तरुण 8 जुलैपासून होता तरुण
कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा शेख मैनोद्दीन हा तरुण 8 जुलैपासून अचानक बेपत्ता झाला होता. याबाबत नातेवाईकांनी पोलिसात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिस तपास करत होते. शहरातील अजिजिया नगरातील बेकरी समोर रात्री साडे अकराच्या सुमारास मैनोद्दीन या तरुणासमवेत काहींनी वाद घातला असल्याची माहिती पोलिसांना कळाली. तेव्हा कोतवाली पोलिसांनी जलदगतीने हालचाली करीत एका संशयितास ताब्यात घेतले. या संशयितास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सय्यद मतीन, शेख नदीम, शाहरुख मिर्झा, शाबाज हुसेन आणि सय्यद हुसेन यांनी हत्या केल्याची कबुली दिली. खूनाचा प्रकार उघडकीस येवू नये म्हणून या आरोपींनी त्या तरुणाचा मृतदेह परभणी तालुक्यातील बोरवंड खुर्द परिसरातील कालव्या लगतच्या दाट झाडीत पुरला असल्याची माहिती कळाली.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद जराड, सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरनर, बळवंत जमादार व अन्य कर्मचार्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी बोरवंड खुर्द शिवारात पुरून ठेवलेला मृतदेह दाखवला. कोतवाली व दैठणा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यावेळी तहसीलदार संजय बिरादार यांच्यासह अन्य कर्मचारीही उपस्थित होते. (Police investigation revealed that the missing youth from Parbhani was murdered)