कुंडलीत दोष आहे सांगितले तरी प्रियकर आयुष्यातून दूर होईना, अखेर प्रेयसीने केले असे काही…
शवविच्छेदन अहवालात विषामुळे शेरोनचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करत हत्येचे गूढ उकलले. याप्रकरणी पोलिसांनी शेरोनची प्रेयसी गरिश्माला अटक केली आहे.
तिरुवअनंतपुरम : रेडिओलॉजीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे गूढ उकलण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. तपासादरम्यान ते सत्य समोर आले ते ऐकून पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला. वारंवार समजावूनही प्रियकर सोडायला तयार नसल्याने प्रेयसीनेच थंड डोक्याने त्याच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. शेरोन असे मयत तरुणाचे नाव आहे. केरळमधील तिरुवअनंतपुरम येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. शेरोनचा 25 ऑक्टोबर रोजी शेरोनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
शवविच्छेदन अहवालात विषामुळे शेरोनचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करत हत्येचे गूढ उकलले. याप्रकरणी पोलिसांनी शेरोनची प्रेयसी गरिश्माला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
शेरोन आणि गरिश्माचे प्रेमसंबंध होते. मात्र गरिश्माचा दुसऱ्या तरुणासोबत विवाह ठरला होता. यामुळे तिला शेरोनसोबत ब्रेकअप करायचे होते. मात्र शेरोन ब्रेकअप करायला तयार नव्हता. गरिश्माने त्याला वारंवार समजावून सांगितले. मात्र तो ऐकायला तयार नव्हता.
आपल्या कुंडलीत दोष आहे. त्यामुळे आपल्या पहिल्या पतीचे निधन होईल, असे भटजींनी सांगितल्याचेही गरिश्माने शेरोनला सांगितले. एवढे सांगूनही शेरोन रिलेशीनशीप तोडायला तयार नव्हता.
अखेर गरिश्माने त्याला आपल्या घरी बोलावले. घरी आल्यानंतर गरिश्माने त्याला ज्यूसमध्ये कीटनाशक मिसळून दिले. ज्यूस प्यासल्यानंतर शेरोन घरी परतताच त्याची प्रकृती खालावली. त्याच्या घरचे लोक त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात घेऊन गेले.
शेरोन गरिश्माच्या घरी गेल्याचे त्याच्या भावाला माहित होते. त्यामुळे त्याने गरिश्माने त्याला काही खायला दिले याबाबत चौकशी केली, मात्र तिने काहीच खायला दिले नाही, असे खोटे सांगितले.
11 दिवसांनंतर उपचारादरम्यान शेरोनचा मृत्यू
रुग्णालयात 11 दिवसानंतर उपचारादरम्यान अखेर शेरोनचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवालात विष पोटात गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी गरिश्माची चौकशी केली असता तिने सुरवातीला पोलिसांना खोटे सांगितले.
शेरोनने जबाबात आपला कुणावर संशय नसल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांना प्रेयसीवरच संशय असल्याने पोलीस तिची कसून चौकशी करत होते. अखेर चौकशीदरम्यान तिने आपला गुन्हा कबुल केला. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे.