कोल्हापुरात एमडी ड्रग्सचा कोट्यवधीचा साठा जप्त! फार्महाऊसवर सुरु होता कारखाना, एकाला अटक

मुंबई पोलिसांनी कोल्हापुरातल्या ढोलगरवाडी गावातून 72 तासाच्या चौकशीनंतर एकाला अटक करण्यात आलीय. या प्रकरणात एका हाय प्रोफाईल वकिलाचा समावेश असल्याचं सांगितलं जातंय. या ठिकाणी छापा मारुन कोट्यवधी रुपयांचा माल मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून जप्त करण्यात आलाय.

कोल्हापुरात एमडी ड्रग्सचा कोट्यवधीचा साठा जप्त! फार्महाऊसवर सुरु होता कारखाना, एकाला अटक
ड्रग्ज (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 2:07 PM

कोल्हापूर : मुंबई ड्रग्स प्रकरणानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स रॅकेट सुरु असल्याचं समोर येत आहे. आता तर थेट कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यात एमडी ड्रग्स रॅकेटचे धारेदोरे मिळाले आहेत. मुंबई पोलिसांनी कोल्हापुरातल्या ढोलगरवाडी गावातून 72 तासाच्या चौकशीनंतर एकाला अटक करण्यात आलीय. या प्रकरणात एका हाय प्रोफाईल वकिलाचा समावेश असल्याचं सांगितलं जातंय. या ठिकाणी छापा मारुन कोट्यवधी रुपयांचा माल मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून जप्त करण्यात आलाय. (Police raid MD drug factory in Chandgad taluka of Kolhapur)

मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ढोलगरवाडीतल्या एका फार्महाऊसवर सलग तीन दिवस तपास करण्यात आलाय. या तपासानंतर एका मोठ्या वकिलाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका फार्महाऊसवर एमडी ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरु होता. मुंबई एका महिला ड्रग्स पेडलरला अटक केल्यानंतर कोल्हापुरातल्या चंदगडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून छापा टाकण्यात आला. कोल्हापुरातील अटक केलेल्या संशयिताला मुंबईला नेल्याची माहिती मिळतेय.

नांदेडमधून 1.1 टन ड्रग्जचा साठा जप्त

दुसरीकडे काल नांदेडमधून 1.1 टन ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून वाहनंदेखील जप्त करण्यात आली आहेत. तशी माहिती एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली आहे. आंध्रप्रदेशातून राज्यासह इतर राज्यांत गांजाची मोठी तस्करी होणार होती, असं देखील त्यांनी म्हटलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, गांजा तस्करीसाठी महाराष्ट्रात आणला जात असल्याची माहिती एनसीबीचे अधिकारी अमोल मोरे आणि सुधाकर शिंदे यांना मिळाली होती. हा गांजा आंध्र प्रदेशातून येत असल्याचेही समजले होते. त्यानुसार, सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांकडून तस्करांसाठी सापळा रचण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

विलेपार्ले परिसरातून कोट्यवधींचे हेरॉईन जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) 2 नोव्हेंबर रोजी मुंबईत मोठी कारवाई केली होती. विलेपार्ले परिसरात करोडोंचे हेरॉईन जप्त करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम सुरू केलीय. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत आलेल्या एनसीबीने विलेपार्ले परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. कोट्यवधींचे हेरॉईन जप्त करण्याच्या या कारवाईची माहिती एनसीबीने दिली होती.

इतर बातम्या :

ठाकरे सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन पडळकरांचा घणाघात

VIDEO: उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा; भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं विधान

Police raid MD drug factory in Chandgad taluka of Kolhapur

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.