इचलकरंजीमध्ये मटक्याच्या अड्ड्यांवर छापे, 76 हजार रुपयांसह 6 मोबाईल जप्त

इचलकरंजी येथे दोन ठिकाणी सुरु असलेल्या मटक्याच्या अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला आहे. (police raid Matka bases)

इचलकरंजीमध्ये मटक्याच्या अड्ड्यांवर छापे, 76 हजार रुपयांसह 6 मोबाईल जप्त
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 8:40 PM

कोल्हापूर : इचलकरंजी येथे दोन ठिकाणी सुरु असलेल्या मटक्याच्या अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात एकूण 76 हजार रुपयांसह 6 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच, यावेळी एकूण 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (police raid on Matka bases in Ichalkaranji 3 has been arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी शहरात मागील काही दिवसांपासून अवैध धंदे जोमात सुरु आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी कारवाई करण्याचे ठरवले. दरम्यान, आसरा नगर येथील निशिगंध कॉलनीमधील सुभाष अग्रवाल यांच्या घरी मटका खेळला जात असल्याचे पोलिसांना समजले. ही माहिती समजताच बी. बी. महामुनी यांनी कारवाई करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सापळ रचत सुभाष अग्रवाल यांच्या घरावर छापा टाकला.

कारवाईत 75 हजारांची रोकड जप्त

या कारवाईत सुभाष अग्रवाल यांच्या घरी सुरु असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर तब्बल 75 हजारांची रोकड मिळाली. तसेच, या ठिकाणाहून 6 मोबाईल जप्त करण्यात आले. दरम्यान, शहरात एकूण दोन ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी सुभाष अग्रवाल (70), प्रसाद निंबाळकर (24), विनायक घट्टे या तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच, त्यांच्याविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधीही शरहात मटका तसेच इतर अवैध धंदे जोमात सुरु होते. मागील वर्षी राकेश अग्रवाल आणि मनीष अग्रवाल यांच्याकडून जालवल्या जाणाऱ्या मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. हे दोन्ही आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यांनतर इचलकरंजी येथे करण्यात आलेली ही दुसरी दुसरी मोठी कारवाई आहे.

संबंधित बातम्या :

प्रेमाचं प्रतिक असलेलं ताजमहल बघायचंय म्हणत पत्नीनं फसवलं, प्रियकरासोबत कट रचून निघृण हत्या

बेपत्ता महिलेचा तीन वर्षांनी शोध, शिर्डीतून महिला गायब का होतात?

अंडी उधार न दिल्याच्या रागातून दुकानदाराचा निर्घृण खून, साताऱ्यातील धक्कादायक घटना

(police raid on Matka bases in Ichalkaranji 3 has been arrested)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.