चालत्या कारमध्ये कपलचे अश्लील चाळे, व्हिडीओ व्हायरल होताच..
धावत्या कारमध्ये प्रेमी युगुलाने अश्लील चाळे केल्याचा एका धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. धरमपेठ या नागपूरच्या उच्चभ्रू परिसरात हा प्रकार घडल्याचे समोर आले असून तो व्हिडीओ पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचला. एक तरूण रस्त्यावर कार चालवत असतानाच, त्या गाडीत असलेली तरूणी त्याच्या मांडीवर बसून अश्लील चाळे करत होती.
धावत्या कारमध्ये प्रेमी युगुलाने अश्लील चाळे केल्याचा एका धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. धरमपेठ या नागपूरच्या उच्चभ्रू परिसरात हा प्रकार घडल्याचे समोर आले असून तो व्हिडीओ पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचला. एक तरूण रस्त्यावर कार चालवत असतानाच, त्या गाडीत असलेली तरूणी त्याच्या मांडीवर बसून अश्लील चाळे करत होती. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि पोलिसांपर्यंत पोहोचला. अखेर पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत त्या युगुलाविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. नागपुरातील लक्ष्मीभुवन चौक ते शंकर नगर दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.
आरोपी तरूण सीए असून त्याची प्रेयसी इंजीनिअर आहे. दोघेही वर्षभरापासून एकत्र आहेत. त्यांन एकत्र फिरायला जायची सवय आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ते दोघे बाहेर जात होते. मात्र लक्ष्मीभुवन चौक ते शंकर नगर दरम्यान तो तरूण कार चालवत असतानाच त्याची प्रेयसी त्याच्या मांडीवर बसली आणि अश्लील चाळे सुरू केले. हा सर्व प्रकार रस्त्यावरील अन्य वाहनचालक बघत होते. मात्र, दोघांना काहीही फरक पडला नाही. दरम्यान बाईकवरून जाणाऱ्या एका इसमाने त्यांचे रेकॉर्डिंग केले आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. काही मिनिटातच लाखोंनी तो व्हिडीओ पाहिला. अनेकांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला.
पोलिसांनी शोधले आरोपी
हा व्हिडीओ पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांपर्यंत पोहचली. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन त्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आरोपी युवक झिंगाबाई टाकळी परिसरातील रहिवासी आहे. मीडियावरील क्लिपमध्ये त्या कारचा नंबर दिसत होता, त्याच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपी तरूणाचा शोध घेतला आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. तर त्याच्या प्रेयसीलाही लवकरच अटक करण्यात येईल.