Vasai Murder Update : वसईतील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यास पोलिसांना यश, आरोपींचा शोध सुरु

अंधेरीतून अपहरण झालेल्या मुलीचा वसईत मृतदेह सापडला आहे. मुलीचे अपहरण कुणी केले आणि हत्या कोणत्या कारणासाठी केली याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. तसेच आरोपींच्या शोधासाठी वसईतील वालीव पोलिसांचे स्वतंत्र पथक रवाना झाले आहे.

Vasai Murder Update : वसईतील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यास पोलिसांना यश, आरोपींचा शोध सुरु
वसईतील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यास पोलिसांना यशImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 1:03 AM

वसई : वसईत वालीव पोलीस ठाण्याअंतर्गत साफडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख (Identity) पटवण्यास पोलिसांना यश आले आहे. सदर मृतदेह अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका 14 वर्षीय शाळकरी मुली (School Student)चा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सदर मुलगी गुरुवारी शाळेत जाण्यासाठी घरुन निघाली होती. पण ती शाळेत गेलीच नाही आणि घरीही पोहचली नाही. यामुळे तिच्या घरच्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात अपहरणा (Kidnapping)चा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शुक्रवारी मुलीचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून बॅगेत भरलेल्या अवस्थेत वसईत सापडला. मुलीने घातलेल्या शाळेच्या युनिफॉर्मवरुन मुलीची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले आहे.

शाळकरी मुलीच्या हत्येमुळे एकच खळबळ माजली आहे. अंधेरीतून अपहरण झालेल्या मुलीचा वसईत मृतदेह सापडला आहे. मुलीचे अपहरण कुणी केले आणि हत्या कोणत्या कारणासाठी केली याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. तसेच आरोपींच्या शोधासाठी वसईतील वालीव पोलिसांचे स्वतंत्र पथक रवाना झाले आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश बर्वे यांनी सांगितले.

वसईत संशयास्पदरित्या आढळला होता मृतदेह

वसईतील वील पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी एक अज्ञात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला होता. रस्त्याच्या कडेला झाडाझुडुपात एका बॅगेत हा मृतदेह टाकण्यात आला होता. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका नागरिकाला तेथून जात असताना वास आल्याने संशय आला. त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता सदर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला. मुलीची निर्दयीपणे वार करुन हत्या करण्यात आली होती. मुलीने घातलेल्या शाळेच्या युनिफॉर्मवरुन पोलिसांनी मुलीची ओळख पटवली आहे. ही हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. (Police succeeded in identifying the unknown body in Vasai)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.