घरातून न सांगता पैसे घेऊन महागडा मोबाईल घेतला, वडिलांनी जाब विचारला, घाबरलेल्या उचललं टोकाचं पाऊल
कल्याण पत्री पुलावर काल रात्री एकच गर्दी जमली होती. गर्दी का जमली म्हणून पहायला पोलीस धावले. समोरील दृश्य पाहून सर्वच हैराण झाले.
कल्याण : कल्याणमधील पत्री पुलावर आढळलेल्या मृतदेहाबाबत उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. वडिलांच्या भीतीने 17 वर्षाच्या मुलाने टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. घरातून न सांगता पैसे घेऊन महागडा मोबाईल घेतला म्हणून वडिलांनी जाब विचारला म्हणून स्टेशन परिसरात जीवन संपवल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मुलगा घरात कोणालाही न सांगता पैसे आणले होते. मोबाईल घेतला त्यामुळे मुलगा घाबरला आणि गावी गेल्यानंतर वडील मला मारतील, या भीतीपोटी त्याने काल रात्रीच्या सुमारास कल्याण स्टेशन पत्री पूल परिसरात जीवन संपवले.
मुलगा मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी
कल्याणमधील पत्री पूल परिसरात काल रत्रीच्या सुमारास रेल्वे रुळाशेजारी झाडाला लटकलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. पोलिसांनी तपास सुरु करत त्याची ओळख पटवली. तसेच मुलगा आणि त्याचे कुटुंब उत्तर प्रदेश येथील गाजीपूरला राहतात.
पैसे चोरल्याने वडिलांच्या भीतीपोटी जीवन संपवले
मयत मुलगा नुकताच बारावी पास झाला होता. त्याला महागडा मोबाईल घ्यायचा होता म्हणून त्याने गावी कुणालाही न सांगता घरातून एक लाख रुपयांची चोरी केली. हे पैसे घेऊन तो उत्तर प्रदेशहून मीरा भाईंदर येथे आपल्या काकाच्या घरी आला आणि त्यानंतर त्या पैशातून आयफोन घेतला. त्यानंतर हा पुन्हा गावी जायला निघाला. या दरम्यान त्याच्या वडिलांना घरातून पैसे गायब असल्याचे माहित पडले. तेव्हा त्यांनी याबाबत मुलाला विचारणा केली.