श्रीपाद छिंदमकडून टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण, नगर पोलिसांत गुन्हा दाखल
शिवद्रोही श्रीपाद छिंदमने एका टपरी चालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत तसंच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी छिंदमसह 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अहमदनगर : शिवद्रोही श्रीपाद छिंदमने (Shripad Chhindam) एका टपरी चालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत तसंच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी त्याच्यासह 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अहमदनगरच्या तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरुद्ध अपशब्द काढून छिंदम चर्चेत आला होता.. छिंदमच्या या बिनअकलेच्या कारवाया थांबत नाहीत… अहमदनगर निवडणुकीवेळी त्यांने ईव्हीएमची पूजा केली होती… तर आता एका टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ करुन तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय…
आरोपींविरोधात गुन्हा दाखल
आरोपी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे आणि राजेंद्र म्याना यांच्याविरोधात नगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय… सदरची घटना 9 जुलै 2021 दिवशी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली…
पोलिसांचा तपास सुरु
याप्रकरणी टपरी चालक भागीरथ भानुदास बोडके यांनी फिर्याद दिली आहे… त्यांच्या फिर्यादीवरून छिंदमसह पाच जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे… पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.
शिवरायांविरोधात छिंदमचे अपशब्द, काय आहे प्रकरण?
अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर असलेल्या श्रीपाद छिंदम याने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरुन बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारे अपशब्द वापरले होते. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी श्रीपाद छिंदम गेल्या वर्षी अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला पुन्हा उभा राहिला होता. अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत त्याचा विजयही झाला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या तसबीरीला अभिवादन करत त्याने प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला होता.
छिंदमने गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपच्या तिकीटावर रिंगणात उतरण्याची हिंमतही केली होती. परंतु मतदारांनी नाकारल्यामुळे तो विधीमंडळाची पायरी चढू शकला नाही.
(Police take A Action Against Shripad Chhindam Over Abuse Street Vendor)
हे ही वाचा :
ठाकरे सरकारला आव्हान, श्रीपाद छिंदमला कोर्टाचा दणका
छत्रपती शिवरायांचा अवमान भोवला, श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका