लखनऊ : गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याच्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळे किंवा अतिआत्मविश्वासामुळे तो पकडला जातोच. सध्या अशाच एका गुन्हेगाराचा शोध कानपूरमधील पोलिस घेत असून त्यासाठी त्यांच्या हाती भक्कम पुरावाही लागला आहे. कानपूरच्या कर्नलगंज भागात पोलिस कमिशनरच्या बंगल्याजवळ 17 जून रोजी सकाळी-सकाळी तीन पोत्यात मृतदेहाचे तुकडे (dead body pieces) सापडल्याने मोठी खळबळ माजली होती. अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या भागातील अशा (murder) घटनेने सर्वत्र चर्चा सुरू झाली. इतक्या क्रूरपणे तुकडे करून कोणी फेकले ? याचा पोलीस सतत शोध घेत आहेत.
या घटनेला आता सहा दिवस उलटून गेले तरी तो मृतदेह कुणाचा आणि अखेर ही हत्या कोणी केली, या प्रश्नाची उकल काही अद्याप झालेली नाही. मात्र पोलिसांनी तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असता एक मोठा खुलासा झाला आहे. मृत व्यक्तीच्या उजव्या हाताच्या मनगटावर काळ्या रंगाने ॐ लिहीलेले आढळले आह. आता याचा चिन्हाच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत.
अवैध संबंध की प्रेमप्रकरण, कशामुळे झाली हत्या ?
पोलिसांना त्या पोत्यात एक महिलेचा सलवार-कुर्ता आणि लहान मुलाचेदेखील कपडे सापडले. तरूणाचे अमानुषपणे केलेले तुकडे आणि पोत्यातील महिलेचे सापडलेले कपडे, यावरून एखादे प्रेमप्रकरण किंवा अवैध संबंधामुळे ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
‘ॐ’ मुळे उलगडेल रहस्य
गेल्या 6 दिवसांपासून पोलिसांचे पथक या हत्येचे रहस्य सोडवण्यात गुंतले आहे. संपूर्ण शहरात विविध लोकांकडे याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. शहरातीव व आजूबाजूच्या परिसरातील बेपत्ता लोकांची यादीही मागणवण्यात आली आहे. मात्र अद्याप काहीही सुगावा लागला नाही. मात्र आता त्या हातावरील ॐ मुळे पोलिसांना आशा वाटू लागली आहे.
हत्येनंतर करण्यात आले तुकडे
कानपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात तरूणाचे तुकडे करून फेकण्यात आले आहेत. त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून त्यानुसार
प्रथम त्या तरूणाची हत्या करण्यात आली व नंतर एका धारदार शस्त्राने त्याचे तुकडे करण्यात आले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्या मृतदेहाच्या उजव्या हाताच्या मनगटावर काळ्या रंगाचा ओमचा टॅटू सापडला आहे. अशा परिस्थितीत आता याच खुणेच्या मदतीने तो मृतदेह नेमका कुणाचा याची ओळख पटवली जाईल. एकदा का मृतदेहाची ओळख पटली की त्याच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होईल, अशी आशा पोलिसांना आहे.