Video : राजकीय वाद बुद्धी करी बाद, भांडणाचा राग धरून चक्क ढाबा पेटवला

सांगलीत दोन गटातील राजकीय वादातून चक्का एक ढाबा पेटवून (Dhabha Fire)  दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी येथील श्रीधर कोळी यांचा नव्याने बांधण्यात आलेला. हा धाबा सोसायटी निवडणुकीत झालेल्या वादाच्या कारणातून मध्यरात्री चक्क पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

Video : राजकीय वाद बुद्धी करी बाद, भांडणाचा राग धरून चक्क ढाबा पेटवला
राजकीय वादातून ढाबा पेटवलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 10:38 PM

सांगली : स्थानिक लेव्हला राजकारणात टोकाचे (Political Dispute) वाद होतात. कधी या वादातून हाणामारी होतात. तर कधी हमरातुमरी. दोन विरोधातले गट नेहमी एकमेकांबद्दल खुन्नसमध्ये असतात. मात्र ही खुन्नस, हा राग एका मर्यादेपर्यंत असला तर ठिक नाहीतर त्याचे विपरित परिणाम दोन्ही बाजुंना भोगावे लागतात. असेच एक प्रकरण सांगलीत (Sangli Crime) घडलंय. कारण सांगलीत दोन गटातील राजकीय वादातून चक्का एक ढाबा पेटवून (Dhabha Fire)  दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी येथील श्रीधर कोळी यांचा नव्याने बांधण्यात आलेला. हा धाबा सोसायटी निवडणुकीत झालेल्या वादाच्या कारणातून मध्यरात्री चक्क पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोळी यांचे 11 लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तेही आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणाबाबत तात्काळ पोलिसात धाव घेतली आहे. याबाबत जत पोलिस ठाण्यात श्रीधर कोळी यांनी सहा जणांविरोधात फिर्याद दिली आहे.

दुसऱ्या गटाच्या अडचणी वाढल्या

यामध्ये पोलिसांनी महांतेश नारायण मलमे, नारायण मलमे, दर्याप्पा मलमे, प्रकाश मलमे, प्रविणकुमार मलगोंडा पाटील, श्रीनिवास मलगोंडा पाटील, अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे यांच्याही अडचणी आता वाढल्या आहेत. ढाबा जळ्याल्याने कोळी यांना तर मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागलेच आहे. मात्र आता ज्यांची या प्रकरणा नावं समोर आली आहेत. त्यांच्याही अडचणी वााढल्या आहेत. कारण हे प्रकरणा आता थेट पोलिसांपार्यत पोहोचून यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. यात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासात पोलिसांच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागण्याची शक्याता आहे. पोलिसांच्या हाती काही लागल्यास ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहेत, त्यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

नेमका वाद कसा पेटला?

या प्रकरणाला सुरूवात झाली निवडणुकीच्या वादापासून. मुचंडी सोसायटीची नुकतीच निवडणूक झाली आहे. काँग्रेस गटाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने एक हाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सायंकाळी कोळी हे बस स्थानक जवळ उभारलेले असताना वरील संशयित आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. शिवाय, रात्री 8 वाजता घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास कोळी यांच्या मालकीचा धाबा पेटवून दिला. त्यामुळे या दोन्ही गटातील संघर्ष आता आणखी वाढला आहे.

डबल मर्डरने सांगली हादरलं, दोन गट आपसात भिडले, दोघांचे मुडदे पडले

घरातच सुरु होता देहविक्रीचा काळाधंदा! ग्राहक बनून गेलेले पोलिस, वास्तव पाहून चक्रावले!

Video : बांधाच्या वादावरुन दोघांना बेदम मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा; घटना कॅमेरात कैद

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.