महाडमधील लॉजवर रात्री अडीच वाजता काय घडलं, मनोरमा खेडकरला पकडण्यासाठी पोलिसांनी असा ट्रॅप लावला

राज्यासह देशभरात पूजा खेडकर प्रकरणाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर गेल्या काही दिवसांपासून फरार होत्या. मुळशीमधील शेतकऱ्याला बंदुक दाखवतानाचा त्यांचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर पुणे पोलीस त्यांच्या शोध घेत होते अखेर ट्रॅप लावत पोलिसांनी त्यांना रात्री अडीच वाजता एका लॉजवर अटक केली.

महाडमधील लॉजवर रात्री अडीच वाजता काय घडलं, मनोरमा खेडकरला पकडण्यासाठी पोलिसांनी असा ट्रॅप लावला
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 5:01 PM

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवलेलं असून त्यांना 23 जुलैपर्यंत मसुरी येथील अकॅडमीध्ये हजर राहण्यास सांगितलं आहे. यामध्ये पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केल्याने प्रकरण वाढलं आहे. अशातच पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केली. आज त्यांना कोर्टात हजर केल्यावर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मनोरमा खेडकर फरार असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके रवाना झाली होतीत. पोलिसांना अखेर यश आलंं मात्र पोलिसांनी ट्रॅप लावत महाडमधील एका लॉजमधून त्यांना ताब्यात घेतलं.

मनोरमा खेडकर यांना पहाटे सहा वाजता महाडमध्ये अटक करण्यात आली. हिरकरणीवाडीमधील पार्वती निवास हॉटेलमध्ये त्यांना बेड्या ठोकल्या. लॉजवर राहण्यासाठी खोट्या नावाने मनोरमाने हॉटेलमध्ये रूम बुक केली. इंदू ज्ञानदेव ढाकणे नाव सांगत आई आणि मुलासाठी रूम घेतली होती. ड्रायव्हरला त्यांनी आपला मुलगा दाखवलं होतं. पोलिसांनाा त्यांच्या ठिकाणाची खबर लागली, रातोरात त्यांच्या मागावर असलेले पोलीस महाडमध्ये पोहोचल.

रात्री अडीच वाजता मनोरमा खेडकर लपून बसलेल्या हॉटलेमध्ये पोलीस दाखल झाले त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करून मनोरमा खेडकर यांना पुण्यात आणलं. मुळशीमधील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याने ही कारवाई करण्यात आली. मनोरम खेडकरांवर 11 विविध कलांतर्गत गुन्हा दाखल आहे. या अटकेनंतर ज्यांनी हे सर्व प्रकरण समोर आणलं ते माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ज्या वेगाने कारवाई व्हायला हवी त्या वेगाने कारवाई होत नाही. यांना अटक झाली ही चांगली गोष्ट, कारण हे प्रकरण उजेडात आल्यानंतर बऱ्याच जणांना तक्रार करण्याची शक्ती मिळावी. आता अटक झाल्यानंतर आणखी काही तक्रारी येतील आणि सर्व बाजूनं कारवाईची सुरुवात होईल असं वाटतंय, असं माहिती अधिकार कार्यकर्ता विजय कुंभार यांनी म्हटलं आहे.

पूजा खेडकर यांना मसुरी येथून आलेलं पत्र

तुमचे जिल्हा प्रशिक्षण पुढे करण्यात आलं असून पुढील आवश्यक कारवाईसाठी तुम्हाला तात्काळ परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्हाला महाराष्ट्र राज्य सरकारच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त करण्यात आले आहे. तुम्हाला शक्य तितक्या लवकर आणि 23 जुलै 2024 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत अकॅडमीमध्ये हजर रहावं लागणार असल्याचं पत्रात म्हटलं आहे.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.