केरळमधील बदलापूर? SDPI कार्यकर्त्याची हत्येनंतर 24 तासांत दुकानात घुसून RSS नेत्याची हत्या

पलक्कड : केरळच्या (Kerala) पलक्कड जिल्ह्यात सध्या बदलापूर सारखे चित्र पहायला मिळत आहे. येथे खुना का बदला खुन असेच काहीसे चित्र रंगले आहे. येथे शनिवारी दिवसाढवळ्या RSS नेत्याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याआधी शुक्रवारी एसडीपीआयच्या (SDPI )एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर काही तासांतच RSS नेत्याच्या हत्येमुळे खळबळ उडाली. सूडाच्या आगीत […]

केरळमधील बदलापूर? SDPI कार्यकर्त्याची हत्येनंतर 24 तासांत दुकानात घुसून RSS नेत्याची हत्या
खून (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 5:33 PM

पलक्कड : केरळच्या (Kerala) पलक्कड जिल्ह्यात सध्या बदलापूर सारखे चित्र पहायला मिळत आहे. येथे खुना का बदला खुन असेच काहीसे चित्र रंगले आहे. येथे शनिवारी दिवसाढवळ्या RSS नेत्याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याआधी शुक्रवारी एसडीपीआयच्या (SDPI )एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर काही तासांतच RSS नेत्याच्या हत्येमुळे खळबळ उडाली. सूडाच्या आगीत ही घटना घडल्याचे मानले जात आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कुटुंबाची चौकशी केली जात आहे. श्रीनिवासन असे मृत आरएसएस नेत्याचे नाव आहे. तो संघाचा माजी शारीरिक शिक्षक प्रमुख राहिला आहे. श्रीनिवासन यांची दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी हत्या केली होती. हल्लेखोरांनी थेट आरएसएस नेत्याच्या दुकानात घुसून त्यांची हत्या केली. त्यानंतर आजूबाजूचे लोक तेथे आले. त्यांनी श्रीनिवासला रुग्णालयात नेण्याच्या प्रयत्न केला मात्र मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या हल्ल्यामागे एसडीपीआयचा हात असल्याचा आरोप भाजप नेते कृष्णकुमार यांनी केला. ते म्हणाले की SDPI कार्यकर्ता सुबैर यांच्या हत्येला पोलिसांनी राजकीय हत्या म्हणून दुजोरा दिलेला नाही. तरीही SDPI हिंसाचाराला चिथावणी देत ​​आहे. एसडीपीआयच्या कार्यकर्त्याची हत्या हे सूडाचे कृत्य असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आमदार शफी परबिल म्हणाले की, येथे हिंसाचार भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सुबैर हे PFI संघटनेचे पदाधिकारी होते

शुक्रवारी पलक्कडमध्ये SDPI चे स्थानिक नेते सुबैर (वय 43) यांची त्यांच्या वडिलांसमोर हत्या करण्यात आली होती. ही घटना जिल्ह्यातील एल्लापुल्ली भागातील आहे. SDPI ही इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ची संलग्न संस्था आहे. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली होती. सुबैर पीएफआयच्या पॅरा रीजनल कमिटीचे अध्यक्ष होते. ते त्यांच्या वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना त्यांना प्रथम कारने धडक दिली आणि नंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

इतर बातम्या :

Kolhapur Election Result ;कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

Video : भररस्त्यात पोरीनं डिलिव्हरी बॉयला पायतानानं तुडवलं!, अहो, कारण तर वाचा की महाराज…

Buldana Hanuman | जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती बुलडाण्यात, हनुमान नगरीत मूर्तीला चढविला 5 क्विंटल फुलांचा हार

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.