प्रसिद्ध गायकावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप, पोलिसांनी मुसक्या आवळल्या ; सिनेक्षेत्रात खळबळ

रिपोर्ट्सनुसार, हा गायक मूळचा बिहारचा असून त्याला गुरुवारी गुरुग्राममधून अटक करण्यात आली आहे.

प्रसिद्ध गायकावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप, पोलिसांनी मुसक्या आवळल्या ; सिनेक्षेत्रात खळबळ
राष्ट्रवादी कार्यकर्ता हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 1:24 PM

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी प्रसिद्ध गायकाला अटक करण्यात आली आहे.  भोजपुरी गायक बाबुल बिहारी उर्फ ​​अभिषेकबाबत ही धक्कादायक बातमी समोर आली आहे.  त्याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

दोन वर्षांपूर्वी घडली घटना

२१ वर्षीय आरोपी हा बिहारचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अभिषेक याला बाबुल बिहारी म्हणून ओळखले जाते, आम्ही त्याला 8 जून रोजी गुरुग्राम येथून अटक केली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक उर्फ ​​बाबुल बिहारी याची दोन वर्षांपूर्वी त्याच्या परिसरातील एका १३ वर्षीय मुलीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने मुलीला फूस लावून राजीव नगर येथील एका हॉटेलमध्ये नेले. जिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. अल्पवयीन मुलीने मात्र ही घटना कोणालाही सांगितली नाही. या घटनेनंतर त्या मुलीने आरोपीपासून अंतर ठेवले होते. इतके दिवस पीडितेच्या कुटुंबीयांनाही या घटनेची माहिती नव्हती.

सोशल मीडियावर पाहिले फोटो

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी आरोपीने अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. फोटो पाहिल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिची विचारपूस केली, तिला काय झाले ते विचारले. त्यानंतर त्या मुलीने तिच्यासोबत काय घडले, हे सांगितले. तिच्या कुटुंबीयांनी ७ जून २०२३ रोजी पोलिसांशी संपर्क साधला.

अल्पवयीन मुलीचे समुपदेशन केल्यानंतर, सेक्टर 14 पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायदा आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.