रत्नागिरी पोस्ट कार्यालय आतून बंद, खिडकीतून दिसलं, महिला पोस्टमास्तरचा गळफास!
पूर्वी तुरे या मुळच्या दापोली तालुक्यातील हर्णेमधील मोठी गोडीबावच्या रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत.
रत्नागिरी : RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण तापलेलं असतानाच दापोली तालुक्यातील मुरुडमध्ये एका पोस्ट मास्तरने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. पोस्टमास्तर पूर्वी तुरे यांनी पोस्ट कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पूर्वी तुरे या मुळच्या दापोली तालुक्यातील हर्णेमधील मोठी गोडीबावच्या रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. तेव्हा तपास केला असता पोस्ट कार्यालयात त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसून आलं.(Postmaster deepali Ture commits suicide at post office in Murud)
पूर्वी तुरे या विवाहित होत्या. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास पतीला पोस्टात कामानिमित्त जात असल्याचं सांगितलं. सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. पूर्वी यांच्या पतीने शोध सुरु केला. रात्री 10 च्या सुमारास त्यांना मुरुड पोस्ट कार्यालय आतून बंद असल्याचं निदर्शनास आलं. खिडकीतून पाहिलं असता पूर्वी यांनी गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पूर्वी यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनं मोठी खळबळ
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केलीय. आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी एक सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय. दीपाली यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिली आहे. यात वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अखेर DFO विनोद शिवकुमार यांच्यावर धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
संबंधित बातम्या :
नवरोबा, आपण बाळाला गमावलं, तू पुन्हा लग्न कर, पण नोकरीवाली बायको नको, दीपाली चव्हाणचं पतीला पत्र, जसंच्या तसं
Postmaster deepali Ture commits suicide at post office in Murud