‘जीवनसाथी’वरुन ओळख, यूकेमध्ये MD असल्याची बतावणी, कल्याणच्या तरुणीला 16 लाखांचा गंडा

यूकेमध्ये एमडी डॉक्टर असल्याचे सांगून कल्याणच्या तरुणीला 16 लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. ( UK Doctor Kalyan young doctor )

'जीवनसाथी'वरुन ओळख, यूकेमध्ये MD असल्याची बतावणी, कल्याणच्या तरुणीला 16 लाखांचा गंडा
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 1:24 PM

कल्याण: युकेमध्ये एमडी डॉक्टर असल्याचे सांगून एका कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या तरुणीला 16 लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून ऑनलाइन फ्रॉड उघडकीस आल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी ही माहिती दिली. (Prakash Sharma named person clamed doctor in UK and cheated sixteen lakh rupees to Kalyan young ladies)

लग्नाचं आमिष

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात राहणारी एक तरुणी नवी मुंबई येथील एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. 2017 मध्ये या तरुणीने जीवन साथी डॉट कॉम वर लग्नासाठी रजिस्ट्रेशन केले होते. तब्बल तीन वर्षानंतर 2020 नोव्हेंबर मध्ये प्रकाश शर्मा नावाच्या एका तरुणाने या तरुणीला संपर्क साधला. तो युकेमध्ये एमडी डॉक्टर आहे. शर्मा यानं त्या तरुणीसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे असे सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग च्या माध्यमातून चर्चा सुरू झाली.

जानेवारी मध्ये प्रकाश हा भारतात येणार आहे, असे त्याने त्या तरुणीला सांगितले. 23 जानेवारी रोजी प्रकाश शर्मा यानं फोन करून सांगितले की तो दिल्ली एअरपोर्ट ला आला आहे. मात्र, त्याच्याजवळ गोल्ड असल्याने त्याला कस्टम ऑफिसरनी पकडले आहे. पैसे भरावे लागतील, आधी त्याने 65 हजाराची मागणी केली. संबंधित तरुणीनं नेट बँकिंग द्वारे प्रकाशला पैसे दिले. त्यानंतर 24 ,25 आणि 26 जानेवारीला काही न काही बतावणी करून प्रकाश शर्मा याने तिच्याकडून जवळपास 16 लाख 50 हजार रुपये घेतले आणि नंतर तो अचानक गायब झाला.

खडकपाडा पोलिसांत तक्रार

आपली फसवणूक झाली असल्याची समजताच त्या तरुणीनं कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी या प्रकरणात तपास सुरू केला अखेर गुन्हा दाखल झाला आहे. ऑनलाइन फसवणुकीचा हा प्रकार असल्याने पोलीस तपास करीत आहे. मात्र, एका उच्च पदावर असलेल्या तरुणीला सोळा लाखाचा गंडा घातला गेल्यानं कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रश्न असा पण आहे की स्वतःला यूकेमध्ये एमडी डॉक्टर म्हणणारा प्रकाश शर्मा हा व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही. फक्त नाव बदलून त्या तरुणीची फसवणूक करण्यात आली आहे. आता पोलीस तपासात सत्य समोर येईल.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून नागरिकांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे.

संबंधित बातम्या

रक्ताच्या थारोळ्यातील ‘त्या’ तरुणीला सहा दिवसांनी शुद्ध, कसा झाला घटनेचा उलगडा?

मुलाच्या अल्पवयीन प्रेयसीला वेश्या व्यवसायात ढकललं, लातुरात महिलेसह सहा जणांना बेड्या

(Prakash Sharma named person clamed doctor in UK and cheated sixteen lakh rupees to Kalyan young ladies)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.