सून माहेरून पैसे नव्हती, मग सासरच्यांनी गर्भवती महिलेसोबत केले भयंकर कृत्य, ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही !

देशात महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. हुंड्यासाठी आजही महिलांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे.

सून माहेरून पैसे नव्हती, मग सासरच्यांनी गर्भवती महिलेसोबत केले भयंकर कृत्य, ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही !
हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेला जिवंत जाळले
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 1:33 PM

मालदा / 8 ऑगस्ट 2023 : माहेरुन पैसे आणले नाही म्हणून गर्भवती विवाहितेला जिवंत जाळल्याची धक्कादायक पश्चिम बंगालमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या हत्येनंतर आरोपी सासरची मंडळी फरार झाली आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. प्रियंका रबीदास असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. आरोपींच्या नातेवाईकांचीही पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पैशासाठी गर्भवतीला जाळल्याने संतापही व्यक्त होत आहे.

तीन वर्षापूर्वी झाला होता विवाह

प्रियंका रबीदास आणि अकालु रबीदास यांचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासूनच सासरचे प्रियंकाचा माहेरुन पाच लाख रुपये हुंडा आणण्यासाठी दबाव टाकत होते. प्रियंका पैसे आणत नव्हती म्हणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु होता. प्रियंका गरोदर राहिल्यानंतरही तिचा छळ थांबला नाही. उलट तिचा छळ वाढत गेला आणि अखेर तिचा मृत्यू झाला.

आधी मारहाण केली, मग जाळले

आरोपींनी 1 ऑगस्ट रोजी रात्री प्रियंकाला बेदम मारहाण केली. मग जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिला जिवंत जाळले. प्रियंकाचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. शेजाऱ्यांनी मालदा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. तेथे आठवडाभर तिच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रियंकाच्या वडिलांनी नोंदवत सासरच्यांविरोधात पोलिसात फिर्याद दाखल केली. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपींची माहिती मिळवण्यासाठी पोलीस त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत. संभाव्य ठिकाणी छापेमारीही करत आहेत.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.