Wardha Suicide : वर्ध्यात प्राध्यापकाची नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही, मात्र 18 जुलैला त्यांचे लग्न असल्याचे समजते.

Wardha Suicide : वर्ध्यात प्राध्यापकाची नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
वर्ध्यात प्राध्यापकाची नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 9:33 PM

वर्धा : नागपूर-अमरावती महामार्गावरील वर्धा नदीपात्रात उडी (Jump) घेऊन एका प्राध्यापकाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. विनोद केशव बागवाले (45) असे आत्महत्या करणाऱ्या प्राध्यापकाचे नाव आहे. विनोद बागवाले हे नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील नबिरा महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक (Professor) म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नदी पात्रात उडी घेतल्याचे नागरिकांना दिसताच पोलिसांना माहिती देण्यात आली. सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने नदी दुभडी भरून वाहत आहे. त्यामुळे अद्याप मृतदेह आढळून आला नाही.

चार दिवसावर लग्न आले असताना उचलले टोकाचे पाऊल

विनोद बागवाले हे नागपूर जिल्ह्याच्या काटोल येथील नबिरा महाविद्यालयात कार्यरत असून गुरुवारी सकाळी ते आपल्या कारने नागपूर-अमरावती महामार्गावरील खंडका नजीकच्या वर्धा नदीपात्राजवळ आले. त्यांनी महामार्गाच्या बाजूला कार उभी करुन नदीत उडी घेतली. ही घटना काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याची माहिती तळेगाव येथील पोलिसांना देताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रात लांबपर्यंत शोध घेतला, पण मृतदेह आढळला नाही. एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यांनी शोधमोहीम सुरु केली असून अद्यापही थांगपत्ता लागला नाही. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही, मात्र 18 जुलैला त्यांचे लग्न असल्याचे समजते. पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Professor commits suicide by jumping into Wardha river)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.