उत्तर प्रदेशातल्या पबजी हत्याकांडाचं (Pubg Murder Mystery) गूढ दिवसेंदिवस वाढतंय. या हत्याकांडप्रकरणी आता 10 वर्षांच्या मुलीनं खळबळजनक खुलासा केलाय. तिने दिलेल्या माहितीनंतर आता या हत्याकांडामागचा (UP Murder Case) मुख्य सूत्रधार कुणी तिसराच व्यक्ती असल्याचा संशय अधिक गडद झालाय. त्यानुसार पोलिसांकडूनही (Police investigation) अधिक तपास केला जातोय. हत्या ज्या रात्री करण्यात आली, त्या दिवशी आईला गोळ्या घातल्यानंतर भावाने मला एका खोलीत बंद केलं होतं. त्यानंतर तो स्कूटी घेऊन बाहेर तिसऱ्या व्यक्तीला भेटायला गेला होता, अशी माहिती 10 वर्षांच्या मुलीनं दिली आहे. ही मुलगीच या हत्याकांडाची प्रमुख साक्षीदार आहे. तिनं दिलेल्या खळबळजनक माहितीमुळे आता पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आहे. हत्या कऱण्यात आलेल्या आईच्या नातलगांनी या हत्येमागे मुलगा नसून त्याला हत्यार म्हणून वापर करण्यात आल्याचा आरोप केलाय. या हत्येमागे तिसराच कुणीतरी आहे. मुलगा आईची हत्या करुन शकत नाही, असा आरोप कऱण्यात आलाय.
पजबी हत्याकांड प्रकरणी पहिल्यांदाच बहिणीचा जबाब पुढे आलाय. यात तिनं म्हटलंय की…
आईला गोळ्या घातल्यानंतर भाऊ पहाटे दोन वाजता बाहेर गेला होता. त्याने मला एका खोलीत बंद केलं. तिसऱ्या एका व्यक्तीची नजर या सगळ्या हत्याकांडावर होती. ज्याला दादा भेटायला गेला, त्याला इथं काय घडतंय, याची संपूर्ण जाणीव होती.
हे सुद्धा वाचा
दरम्यान, कुटुंबीयांनी आरोप केलाय की, आईची हत्या करण्यासाठी मुलाला प्रवृत्त करण्यात आलं. त्याच्या मनात आईबद्दल द्वेष भरवण्यात आला होता. आई त्याला सारखी ओरडायची. पण वडील पाठीशी घालत होते. त्यानंतर आईबद्दल त्याचा द्वेष इतका प्रचंड वाढला की त्यातूनच त्यानं हे क्रूर कृत्य केलं असावं, अशी शंका नातलगांनी उपस्थित केलाय.
दरम्यान, मुलाचं काऊन्सिलिंग केल्यानंतरही या हत्येमागे तिसरा कुणीतरी व्यक्ती असेल, अशी शंका उपस्थित करण्यात आलेली होती. या मुलाला विचारण्यात आलेल्या प्रश्नांनंतरही तो आईची हत्या करेल, अशी शक्यता कमी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. बाल संरक्षण आयोगाच्या सदस्य सूच्चिता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाला आपल्या आईप्रती आत्मीयता होती आणि तो कधी आईला मारु शकत नाही. तो भांडू शकतो. नाराज होऊ शकतं. घर सोडून जाऊ शकतो. पण त्यानं विदेशी पिस्तुलातून आईव र गोळ्या झाडण्यामागचं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीत. त्यामुळे या हत्याकांडामागे तिसरा कुणीतरी व्यक्ती असण्याचा संशय आहे.
आता रिचर्स विंग या मुलाची चौकशी करणार आहे. यात दोन सायकॉलॉजिस्ट, दोन अधिवक्त, दोन डॉक्टर आणि दोन बाल संरक्षण आयोगाचे लोक मुलाला प्रश्न-उत्तर करतील. त्यातून या संपूर्ण घटनेचा तपास केला जाईल. दिवसेंदिवस या हत्याकांडाचं गूढ वाढत चालंय. या हत्याकांडाचा गुंता सोडवण्यासाठी आता पुन्हा नव्यानं तपास केला जाण्याची शक्यताय.