“खडकवासला जवळ गाडी लावून आत्महत्या करतोय, गाडी विकून येणारे पैसे आईला द्या”

पुण्यातील तरुणाने पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरणाच्या भिंतीजवळ पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली (Pune Suicide Khadakwasla Dam )

खडकवासला जवळ गाडी लावून आत्महत्या करतोय, गाडी विकून येणारे पैसे आईला द्या
पुण्याचा पाणीकोटा वाढला
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 12:02 PM

पुणे : “माझी गाडी (बाईक) खडकवासला धरणाजवळ (Khadakwasla Dam) लावली आहे. मी आत्महत्या करत आहे. आईची काळजी घ्या. गाडी विकून येणारे पैसे माझ्या आईला द्या” असा व्हॉइस मेसेज चुलत भावाला पाठवून तरुणाने आत्महत्या केली. पुण्यातील 31 वर्षीय तरुणाने खडकवासला धरणात उडी घेऊन आयुष्य संपवलं. (Pune 31 years old man commits Suicide in Khadakwasla Dam Voice messages Cousin to take care of mother)

पाण्यात मृतदेह तरंगताना आढळला

चंद्रशेखर गोपाळ पुजारी या तरुणाने पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरणाच्या भिंतीजवळ पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. तो पुण्यातील सोमवार पेठ भागातील रहिवासी होता. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

चुलतभावाला व्हॉईस मेसेज

चंद्रशेखर गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणाजवळ गेला होता. तिथून त्याने आपल्या चुलत भावाला व्हॉइस मेसेज पाठवला होता. ‘माझी गाडी खडकवासला धरणाजवळ लावली आहे. मी आत्महत्या करत आहे. माझ्या आईची काळजी घ्या. गाडी विकून जे पैसे येतील, ते माझ्या आईला द्या’ असा तो मेसेज होता.

नातेवाईकांकडून मिसिंगची तक्रार

चुलत भाऊ आणि चंद्रशेखरच्या इतर नातेवाईकांनी तातडीने खडकवासला येथे धाव घेतली. तेव्हा धरण परिसरात त्याची दुचाकी पार्क केलेली सापडली. त्यामुळे नातेवाईकांनी फरासखाना पोलीस ठाण्याच्या गाडीतळ चौकीत चंद्रशेखर हरवल्याची तक्रार दाखल केली.

दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणाच्या भिंतीजवळ रस्त्याला लागून एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती स्थानिकांनी हवेली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला होता. फरासखाना पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

ऑक्सिजन बेडअभावी आईने प्राण सोडले, सॅनिटायझर पिऊन लेकीची आत्महत्या

औरंगाबादमध्ये आईची दोन चिमुकल्यांसह तिसऱ्या मजल्यावरुन उडी, नेमकं काय घडलं?

(Pune 31 years old man commits Suicide in Khadakwasla Dam Voice messages Cousin to take care of mother)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.