कुख्यात गुंड गज्या मारणेच्या टोळीतील आणखी एक गुंड गजाआड, पुणे पोलीसांनी असा रचला होता सापळा…

पुणे शहरात दहशत निर्माण करत कुख्यात गुंड झालेल्या गज्या मारणेला आणि त्याच्या टोळीला पुणे पोलीसांनी चांगलेच रडारवर घेतले आहे.

कुख्यात गुंड गज्या मारणेच्या टोळीतील आणखी एक गुंड गजाआड, पुणे पोलीसांनी असा रचला होता सापळा...
हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळली तरुणीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 8:43 PM

Pune Crime News : पुणे पोलिसांसाठी (Pune Police) नेहमीच डोके दुखी ठरत असलेल्या गज्या मारणेच्या ( Gajya Marne ) टोळीतील एका गुंडाला अटक करण्यात पुणे पोलीसांना यश आले आहे. शेयर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी दिलेल्या चार कोटींच्या बदल्यात वीस कोटींची मागणी करत पुण्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण करत त्याला धमकी (Pune Crime News) दिली होती. त्या प्रकरणात गज्या मारणेसह त्याच्या टोळीवर थेट मोक्काची कारवाई करण्यात आली होती. त्यातीलच काही आरोपी फरार होते, पुणे पोलिसांचे गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मागावर होते. त्यातील एका मोठ्या गुंडाला पुणे पोलीसांनी सापळा रचत नवले ब्रीज येथून अटक केली आहे. मयूर राजेंद्र निवंगुणे असे 24 वर्षीय गुंडाचे नाव आहे. तो नर्हे येथील वसंत प्लाझामध्ये राहणारा आहेत. 7 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या अपहारनातील हा सहावा आरोपी असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.

पुणे शहरात दहशत निर्माण करत कुख्यात गुंड झालेल्या गज्या मारणेला आणि त्याच्या टोळीला पुणे पोलीसांनी चांगलेच रडारवर घेतले आहे.

गज्या मारणे हा गुंड कोरोना काळात एका खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर आला होता, त्यावेळी त्याने हजारो वाहनांची रॅली काढत जल्लोष केला होता.

हे सुद्धा वाचा

गज्या मारणे यांनी त्याच्या सहकाऱ्यांनी पुणे पोलीसांना एकप्रकारे आवाहनच दिले होते, सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून पुणे पोलीसांनी शंभरहून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला होता.

यापूर्वी देखील खुनासह, धमक्या आणि खंडणी सारख्या मोठ्या गुन्ह्यात प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष कुख्यात गुंड गज्या मारणे सहभाग दिसून आला आहे.

त्यानंतर गज्या मारणे हा पोलीसांच्या रडारवरच होता, त्याच्यावर मोक्काची कारवाई देखील झाली आहे, त्यातच दुसऱ्याच्या फोनवरुन खंडणी आणि धमकी दिल्यावरुन त्याच्यासह त्याच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मी महाराज बोलतोय, तुमचा जो काय विषय असेल तो मिटवून घ्या, नाही तर तुला संपवून टाकीन, अशी धमकी कुख्यात गुंड गज्या मारणे याने दिली होती.

यावरून गुन्हा दाखल झाला आणि गज्या मारणेसह पप्पु घोलप, अमर किर्दत, रुपेश मारणे, सांगलीचा हेमंत पाटील अशा १४ जणांवर गुन्हा दाखल केला.

त्यातील चौघांना अटक केली आहे. चंदगडचा डॉ.प्रकाश बांदिवडेकर याचा सहभाग आढळल्याने त्यालाही इंदूरहून अटक केली. असून मयुर राजेंद्र निवंगुणे हा सहावा आरोपी आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.