या जिल्ह्यात मागील पाच दिवसांमध्ये सहा तरुण-तरुणी बेपत्ता, कारण समजताचं पालकांच्या पायाखालची जमीन सरकली, पोलिस…
एका वयात संपूर्ण महाराष्ट्रातून मुली आणि मुलं पळून जाण्याची संख्या अधिक आहे. त्यांना सध्या समूपदेशन करणं गरजेचं असल्याचं काही तज्ज्ञाचं मतं आहे. पोलिस अद्याप न सापडलेल्या मुलांच्या शोधात आहेत.
भोर : पुण्याच्या भोर पोलिस (pune bhor poloice station) ठाण्याच्या हद्दीतून, मागील पाच दिवसांमध्ये सहा तरुण-तरुणी बेपत्ता (youth missing) झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये चार मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. यापैकी पालक रागावल्यामुळे पळून गेलेल्या मुलाला पोलिसांनी शोधून पुन्हा घरी सोडलं आहे. तर एक मुलगी लग्न करून पोलिस ठाण्यात हजर झाली आहे. उर्वरित तीन मुली आणि एक मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. पोलिसांकडून शोध सुरू आहे. बेपत्ता झालेले सर्व जण 18 ते 22 या वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वयात आलेल्या तरुण-तरुणी प्रेम प्रकरणातून पळून जात असल्यानं, या वयोगटातील तरुणांना समुपदेशनाची (counselling) गरज असल्याचं तज्ञ्जांनी मत व्यक्त केलं आहे.
जी मुलं घरातून पालक रागावल्यामुळं गेली होती. त्यापैकी काही जणांना पोलिसांनी तात्काळ घरी सोडलं आहे. त्याचबरोबर त्यांना समजून देखील सांगण्यात आलं आहे. पालकांना आणि त्या मुलाला अशी दोघांना पोलिसांनी समजूत घातली आहे. काही मुलींनी मनाच्या विरोधात लग्न ठरल्यामुळं आवडत्या मुलासोबत लग्न केलं असल्याची माहिती मिळाली आहे. 18 ते 22 या वयोगटातील मुलं मागच्या पाच दिवसांमध्ये गायब झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात मोठी चर्चा आहे.
उर्वरीत मुलांचा पोलिस शोध घेत आहेत. ती सुध्दा मुलं तिथंच कुठंतरी जवळपास असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ज्या मुलींनी लग्न केलं आहे. त्यांच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. कारण मुलीच्या लग्नासाठी त्यांनी आतापर्यंत लाखो रुपयांची तयारी केली होती अशी माहिती मिळाली आहे. त्या पालकांना सुध्दा पोलिसांनी समजवून सांगितलं आहे.
एका वयात संपूर्ण महाराष्ट्रातून मुली आणि मुलं पळून जाण्याची संख्या अधिक आहे. त्यांना सध्या समूपदेशन करणं गरजेचं असल्याचं काही तज्ज्ञाचं मतं आहे. पोलिस अद्याप न सापडलेल्या मुलांच्या शोधात आहेत.