मध्य प्रदेशातून विक्रीसाठी आणलेली 17 पिस्टल जप्त, सात आरोपींना अटक

पुणे शाखेच्या गुन्हे शाखेने कारवाई करत पिस्टल विक्रीसाठी आलेल्या सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातून विक्रीसाठी आणलेली 17 पिस्टल जप्त, सात आरोपींना अटक
पुणे गुन्हे शाखेच्या कारवाईत 17 पिस्टल जप्तImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 7:13 PM

पुणे / अभिजीत पोते : गावठी पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीच्या मुसक्या आवळण्यास पुणे पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 17 पिस्टलसह 13 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पुण्यात अवैधरीत्या गावठी पिस्टलची विक्री करणाऱ्या सात सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने ही कारवाई केली. या आरोपींनी मध्य प्रदेशमधून ही गावठी पिस्टल आणली होती. हनुमंत गोल्हार, प्रदीप गायकवाड, अरविंद पोटफोडे, शुभम गरजे, ऋषिकेश वाघ आणि अमोल शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस त्यांची अधिक चौकशी करत आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केली कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, पिस्टल विक्री करणारे दोन तरुण वाघोली भागातील एका लॉजवर वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून या दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले.

आरोपींकडून 21 लाखांचा मुद्देमाल जप्त

अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून पिस्टल घेणाऱ्या तरुणांना देखील पोलिसांनी अटक केली. हे सगळे जण अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. या आरोपींकडून 13 गावठी बनावटीच्या पिस्टल यासह 4 जिवंत काडतुसे तसेच एक चारचाकी, मोबाईल असा 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या कारवाईत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

दुसऱ्या कारवाईत, सुसगाव येथे कारवाई करत पोलिसांनी एका कारवाईत 4 पिस्टल आणि 9 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. साहिल चांदेरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून 4 पिस्टलसह 9 जिवंत काडतुसे असा एकूण 2,49,000 रुपयंचा ऐवज जप्त केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.