Pune Crime : पुण्यात आणखी एक मर्डर, मित्राकडूनच कोयत्याने वार, उत्तमनगरमधील घटना

Pune Crime : सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. गेल्या रविवारी माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेला एक आठवडा होताच आणखी एका तरूणाची हत्या झाली आहे.

Pune Crime : पुण्यात आणखी एक मर्डर, मित्राकडूनच कोयत्याने वार, उत्तमनगरमधील घटना
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 9:53 PM

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक आठवडाही पूर्ण नाही तर आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. पुण्यातील उत्तमनगर येथे मित्रानेच त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करत त्याची हत्या केली आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली आहे. उत्तमनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे.

जयदीप भोडेकर वय २२ अस मयत तरुणाचे नाव आहे. आरोपी अमित गुजरला उत्तमनगर पोलिसांनी केली अटक आहे. उत्तमनगर मासेअळीमध्ये ही घटना घडलीये. जयदीप भोडेकर आणि अमित गुजर दोघेही एकमेकांचे मित्र होते. दोघांमुळे किरकोळ वाद झाला आणि अमित गुजरने जयदीपला संपवून टाकलं. या प्रकरणाचा उत्तमनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुणे म्हणजे विद्यचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख आहे. मात्र आता ही ओळख पुसत चालली आहे. पुण्यामध्ये दिवसेंदिवस भरदिवसा हत्या होत आहेत. पुण्यामध्ये कोयता टोळीच्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच हल्ला झाला होता. रत्नदीप गायकवाड असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव होतं. दीड दमडीचे गुंड पोलिसांवर हल्ला करण्याची हिंमत करू लागले आहेत.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाला. नाना पेठेमधील डोके तालीमसमोर घराजवळ उभे असलेल्या वनराज यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी आधी गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वारही केले.  हा हल्ला घरगुती संपत्तीच्या वादातून झाल्याचं समोर आलं होतं. वनराज आंदेकर यांच्या बहिणीसह तिच्या पतीचा या हल्ल्यामागे हात होता.

मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.
लालबागचा राजा मंडपातून मार्गस्थ, शेवटच्या निरोपासाठी भक्तांची गर्दी
लालबागचा राजा मंडपातून मार्गस्थ, शेवटच्या निरोपासाठी भक्तांची गर्दी.
लालबागच्या राजाची निरोपापूर्वीची आरती, खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी
लालबागच्या राजाची निरोपापूर्वीची आरती, खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी.
वडील दादांसोबत सत्तेत अन् मुलं वेगळ्या दिशेनं? बापांचा प्लॅन बी तयार?
वडील दादांसोबत सत्तेत अन् मुलं वेगळ्या दिशेनं? बापांचा प्लॅन बी तयार?.
जरांगेंचं निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषण, आरक्षण नाही तर पाडापाडी
जरांगेंचं निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषण, आरक्षण नाही तर पाडापाडी.