Vanraj Andekar Murder : मारेकऱ्यांच्या हल्ल्यात शराराची चाळण… कोण आहे वनराज आंदेकर ? कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास काय ?

पुण्यात काल रात्री झालेल्या हत्याकांडाने शहर हादरलं आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला तसेच कोयत्याने वार करत त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी आत्तापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Vanraj Andekar Murder : मारेकऱ्यांच्या हल्ल्यात शराराची चाळण... कोण आहे वनराज आंदेकर ?  कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास काय ?
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 12:30 PM

पुण्यातील नाना पेठेत रविवारी रात्री घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भररस्त्यात गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. 5-6 बाईक्सवरून आलेल्या हल्लेखोरांनी वनराज यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या.एवढेच नव्हे तर ते खाली कोसळल्यावर त्यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आले. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आंदेकरांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुण्यासारख्या शहरात,रात्री, वर्दळीच्या जागी भररस्त्यात असा गुन्हा घडतो, कायद्याची कोणतीही भीती v बाळगता हल्लेखोर एकाचा थेट जीव घेतात या घटनेने प्रचंड खळबळ माजली असून शहरात दहशतीचं वातावरण आहे.

पुण्यातच काही महिन्यांपूर्वी  कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची भरदिवसा हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना आता वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली आहे. या  हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

घरगुती वादातून घेतला जीव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास ही हत्या झाली. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून त्यामध्ये 13 हल्लेखोर दिसत आहेत, ज्यांनी एकत्र येऊन आंदेकर यांना गोळ्या घातल्या.तसेच त्यांच्यावर कोयत्यानेही वार केले. हा हल्ला पूर्वनियोजित होता असा पोलिसांना संशय आहे, कारण हल्ला करण्यापूर्वी त्या परिसरातील वीजही घालवण्यात आली होती. वनराज यांच्यावर बेछूट गोीबार करून, त्यांचा खून केल्यावर सर्व हल्लेखोर पटापट बाईक्सवर बसून तेथून फरार झाले. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तीन संशियातान ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. गणेश कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार आबा कदम अशी या तिघांची नावे आहेत. गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याचा जावई असल्याची माहिती समोर येत आहे.

कोण आहे वनराज आंदेकर ?

वनराज आंदेकर 2017 ते 2022 मध्ये नगर सेवक होते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर वनराजची आई राजश्री आंदेकर या देखील नगरसेवक होत्या. त्यांनी दोन वेळा नगर सेवक पद भूषवलं होतं. तर वनराज आंदेकरचे चुलते उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक होते. त्यांच्या कुटुंबातील आणखी एक महिला,  वत्सला आंदेकर यांनी पुण्याचं महापौरपद भूषवलं होतं.

आंदेकर कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास

आंदेकर कुटुंबाचा पुण्यातील गुन्हेगारी विश्वात मोठा प्रभाव आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून आंदेकर टोळीचा पुण्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये हात होता. गँगस्टर प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खून प्रकरणी वनराजचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरला आजीवन कारावासाची शिक्षा झाली होती. तसेच त्यांच्याविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आणि मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सूर्यकांत आंदेकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या असून 1985 पासून अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. आंदेकर कुटुंबाच्या गुन्हेगारी इतिहासामुळे या घटनेने राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून...
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून....
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ.
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?.
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य.
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा...दानवेंची सरकारवर टीका
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा...दानवेंची सरकारवर टीका.
सरकारच्या योजनांमुळे सरकारची तिजोरी संकटात? वित्तविभागाला फुटला घाम?
सरकारच्या योजनांमुळे सरकारची तिजोरी संकटात? वित्तविभागाला फुटला घाम?.
एन्काऊंटर स्टोरीत प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानं ट्विस्ट, ऑडिओमध्ये काय?
एन्काऊंटर स्टोरीत प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानं ट्विस्ट, ऑडिओमध्ये काय?.
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार.
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?.
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?.