पुणे : उन्ह्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जायला सगळ्यांना आवडतं. तिथं गेल्यानंतर मुलांना काय करु काय नको अशी अवस्था असते. काल पुण्यातील हडपसर (pune hadapsar) भागात एक घटना घडली आहे. त्यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. मामासोबत स्विमिंगपूलमध्ये पोहायला गेलेल्या भाच्याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्या मुलाचं वय १६ असल्याची माहिती पोलिसांनी (pune police) दिली आहे. तो मुलगा ९ वीच्या वर्गात शिकत होता. कृष्णा शिंदे (१६) असे तलावात बुडून मुत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना घडल्यानंतर मुलाच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी त्या मुलाचं मृतदेह (deadbody) ताब्यात घेतला अजून शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा हा हडपसर भागात राहायला असून तो जवळ असलेल्या साधना शाळेत इयत्ता ९वी मध्ये शिकत होता. साधना शाळेच्या गेटच्या शेजारी एक जलतरण तलाव आहे. कृष्णा हा त्याच्या मामासोबत पोहायला गेला होता. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पोहून झाल्यानंतर मामा स्विमिंग पुल मधून आले. दरम्यान, त्यांनी कृष्णा कुठे आहे शोधायला सुरुवात केली. मात्र कृष्णा दिसत नव्हता. कृष्णा हा त्याच्या कपड्यासह पाण्यात बुडाला असल्याचे दिसून येताच स्थानिकांनी त्याला बाहेर काढले. कृष्णाला जवळील रुग्णालयात तात्काळ दाखल केले मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नदी, तलाव, धरण अशा ठिकाणी पाण्यात बुडून अनेकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. काही घटनांमध्ये फक्त पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू झाला आहे.