Pune Porsche Accident : हिट अँड रनप्रकरणाचा अहवाल आला, आरोपीने दारू घेतली होती का?, अहवालात नेमकं काय?

| Updated on: May 22, 2024 | 10:49 AM

नामवंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत वेगाने कार चालवून एका बाईकला धडक दिली आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामुळे एकच खळबळ माजली. तेथील स्थानिकांनी अल्पवयीन आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

Pune Porsche Accident : हिट अँड रनप्रकरणाचा अहवाल आला, आरोपीने दारू घेतली होती का?, अहवालात नेमकं काय?
पुणे अपघात
Image Credit source: ANI
Follow us on

नामवंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत वेगाने कार चालवून एका बाईकला धडक दिली आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामुळे एकच खळबळ माजली. तेथील स्थानिकांनी अल्पवयीन आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र अवघ्या काही तासांतच त्याची जामीनावर सुटकाही झाली. यामुळे सर्वत स्तरांत रोष पसरला. अखेर गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी देखील या घटनेची दखल देत कोणालाही पाठिशी घालणार नाही, कडक कारवाई करू असे आश्वासन दिले. याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील, विशाल अग्रवाल यांना काल छ. संभाजीनगरमधून अटक केली. आज त्यांना व आरोपी मुलाला पोलिस हे न्यायालयासमोर हजर करणार आहेत.

आता याप्रकरणी आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अपघातावेळी त्या अल्पवयीन आरोपीने मद्यप्राशन केले होते असा दावा करण्यात आला होता, त्यानंतर त्याची चाचणी करण्यात आली. मात्र त्या चाचणीचा अहवाल येण्याआधीच न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि तपासणीसाठी ससून रुग्णालयात तसे च आणखी एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. अखेर आता या मुलाचा अहवाल आला असून ससून रुग्णालयाने तो अहवाल पोलिसांकडे सादर केला आहे. काल रात्री पुणे पोलिसांना हा अहवाल देण्यात आला. अपघातावेळी त्या मुलाने मद्य घेतले होते की नाही ते या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. ससूनचा हा अहवाल आज पोलिसांकडून कोर्टात सादर होण्याची शक्यता आहे.

विशाल अग्रवाल यांना कोर्टात करणार हजर

हे सुद्धा वाचा

या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी काल छ. संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. सध्या ते फरासखाना पोलिसांच्या ताब्यात आहे. आज दुपारी २ वाजता त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

आरोपीसह मित्रांनी इतक्या रुपयांची रिचवली दारु

17 वर्षीय मुलाने बेदरकारपणे कार चालवून पुण्यात मध्यरात्री दोघांचा बळी घेतला. ते दोघेही मुळचे मध्यप्रदेशातील होते. याप्रकरणी अजून एक बाब समोर आली आहे. एका वृत्तानुसार, आरोपीने मित्रांसोबत त्यादिवशी दारु आणि खाद्यपदार्थांवर 48,000 रुपये खर्च केले होते. पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी अगोदर एका रेस्टॉरंटमध्ये गेला. मित्रांसोबत रात्री 9:30 ते मध्यरात्रीपर्यंत एका रेस्टॉरंटमध्ये दारु पीत होता. त्यानंतर त्याने अजून एका हॉटेलमध्ये मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दारु प्यायली. त्यानंतर तो मित्रांसोबत आलिशान पोर्श कारमधून भरधाव निघाला. 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आरोपीने मित्रांना पार्टी दिल्याचे समोर आले आहे. रात्री रात्री 9:30 ते मध्यरात्रीपर्यंत तो मित्रांसोबत पीत असलेला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यावेळी टेबलवर दारुच्या बाटल्यांचा खच पण दिसत आहे. त्यानंतर त्याने दोघांचा कारने धडक देऊन जीव घेतला.