Pune Crime : वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कोर्टाकडून दोन्ही मेहुण्यांना पोलीस कोठडी
Pune crime Vanraj Aandekar Murder Update : पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये वनराज यांचे मेहुणे असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुण्यातील नाना पेठ येथे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. रविवारी रात्री नऊ वाजता दहा ते बारा जणांनी मिळून त्यांची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या केलेली. या प्रकरणात वनराज आंदेकर यांच्या बहिणीसह त्यांच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. संपत्तीच्या वादामधून ही हत्या झाल्याची माहिती समजत आहे. अशातच या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणांमध्ये पोलिसांनी बहीण संजीवनीसह आणखी दोघे असे एकूण पाच जणांना अटक केली आहे. यातील गणेश लक्ष्मण कोमकर आणि जयंत लक्ष्मण कोमकर यांना दोन जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर उर्वरित दोन जणांना सोमवारी दुपारी अटक करण्यात आली, त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गणेश लक्ष्मण कोमकर आणि जयंत लक्ष्मण कोमकर या दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वनराज आंदेकर आणि त्यांच्या सख्ख्या बहीणी यांच्यात संपत्तीवरून वाद होता. नाना पेठेमधील एक दुकान गणेश कोमकर यांना देण्यात आले होते. मात्र हे दुकान महापालिकेकडून अतिक्रमण कारवाईमध्ये पाडण्यात आले होते. त्यानतंर आंदेकर यांच्या एका माणसासोबत कोमकर याचे भांडण झाले होते. त्या भांडणामध्ये आंदेकर यांनी मध्यस्थी केल्याचाही राग त्यांच्या मनात होता. संपत्ती आणि या भांडणाचा रागात आरोपी वनराज यांच्या मर्डरचा प्लॅन त्यांनी केला. होता.
सोमनाथ गायकवाड याला वनराज यांची सुपारी दिली. रविवारी संध्याकाळी आंदेकर यांच्या घरात कौटुंबिक कार्यक्रम होता, त्यानंतर ते नऊच्या सुमारास आपल्या चुलत भावासह खाली उभे राहिले होते. त्यावेळी अचानाक दुचाकीवाले त्यांच्याजवळ आले आणि गोळीबार करू लागले. जवळपास दहा ते बारा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. पाच राऊंड फायर केले त्यानंतर काहींनी आपल्या शर्टमध्ये लपवलेला कोयता बाहेर काढला आणि त्यांच्यावर वार केले.