Pune ATM Theft : पुणे-सातारा महामार्गावर सेंट्रल बँकेचं एटीएम चोरट्यांनी फोडलं, आठ लाखांची रक्कम लंपास

गॅस कटरच्या साह्यानं एटीएम मशीन फोडून, कॅश डिस्पेन्सरमधील एकूण 7 लाख 96 हजार 400 रुपयांची रक्कम लंपास केली.

Pune ATM Theft : पुणे-सातारा महामार्गावर सेंट्रल बँकेचं एटीएम चोरट्यांनी फोडलं, आठ लाखांची रक्कम लंपास
पुणे-सातारा महामार्गावर सेंट्रल बँकेचं एटीएम चोरट्यांनी फोडलंImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 9:56 PM

पुणे : सातारा महामार्गवरील वेळू गावच्या हद्दीतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं एटीएम (ATM) चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्यानं फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडून त्यातली 8 लाखांची रक्कम चोरुन (Stole) नेली. या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात खेड शिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशनंमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळख लपवण्यासाठी चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. आज सुट्टी असल्याने ही चोरीची घटना दुपारपर्यंत कुणाच्या लक्षात आली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, चोरट्यांचाही शोध घेत आहेत.

ओळख पटू नये म्हणून कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारला

पुणे-सातारा महामार्गावर वेळू येथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक आहे. बँकेच्या शेजारी बँकेचं एटीएम आहे. आज पहाटे चोरट्यांनी साडे चारच्या सुमारास एटीएममध्ये प्रवेश केला. त्यानंतर ओळख लपवण्यासाठी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. त्यानंतर गॅस कटरच्या साह्यानं एटीएम मशीन फोडून, कॅश डिस्पेन्सरमधील एकूण 7 लाख 96 हजार 400 रुपयांची रक्कम लंपास केली. एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेला नाही. मोहरमनिमित्त बँकेला सुट्टी असल्यानं दुपारपर्यंत ही घटना लक्षात आली नाही.

कॅश भरणा करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरमुळे चोरीची घटना उघड

एटीएममध्ये कॅश भरणाचे कॉन्ट्रॅक्ट असणाऱ्या इपीएस या कंपनीचे रिजनल मॅनेजर यांना एटीएम फुटल्याचा संशय आला. त्यांनी कंपनीचे कर्मचारी इराप्पा मेलकरी यांना जाऊन चेक करण्यास सांगितले. त्यानंतर ही घटना समोर आली. या प्रकरणी अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इराप्पा मेलकरी यांनी याविरोधात फिर्याद दिली आहे. खेड शिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिक तपास करत आहेत. (8 lakh cash stolen from central bank ATM on Pune Satara highway)

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.