पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्याने जीवन संपवले, कारण अद्याप अस्पष्ट

जॉर्डन हा मूळचा बंगळुरु येथील रहिवासी होता. तो पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील एमआयटी महाविद्यालयात डिझाईन विभागात चौथ्या वर्षात शिकत होता.

पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्याने जीवन संपवले, कारण अद्याप अस्पष्ट
वीजेचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 10:05 PM

पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबताना दिसत नाही. अज्ञात कारणातून पुण्यात एका महाविद्यावलयीन विद्यार्थ्याने आत्महत्या (College Student Suicide) केल्याची घटना आज घडली आहे. जॉर्डन पब्लिसीयेस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयात (MIT College) जॉर्डन शिकत होता. या घटनेची लोण काळभोर पोलिसात (Loni Kalbhor Police) नोंद करण्यात आली आहे. पुढील प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मूळचा बंगळुरुतील आहे विद्यार्थी

जॉर्डन हा मूळचा बंगळुरु येथील रहिवासी होता. तो पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील एमआयटी महाविद्यालयात डिझाईन विभागात चौथ्या वर्षात शिकत होता. आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जॉर्डनने आत्महत्या केल्याची घटना घडली.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

जॉर्डनने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप माहिती मिळू शकली. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

जॉर्डनच्या आत्महत्येबाबत त्याच्या पालकांना माहिती देण्यात आली आहे. त्याचे पालक आल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.

यवतमाळमध्ये शेतकरीपुत्राची आत्महत्या

सततची नापिकी आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न यामुळे यवतमाळमध्ये शेतकरीपुत्राने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संजय दिगंबर भागडे असे मयत 35 वर्षीय तरुणाचे नाव आहे. संजयच्या पश्चात दोन भाऊ आणि आई-वडिल असा परिवार आहे.

संजयच्या वडिलांकडे तीन एकर जमीन आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि सततची नापिकी यामुळे घरी उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. याच नैराश्येतून संजयने आत्महत्या केली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.