विनय जगताप, प्रतिनिधी, भोर (पुणे) : घराबाहेर पडलेला व्यक्ती घरी परत आला नाही, तर घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकते. घरापबाहेर पडलेला व्यक्ती केव्हा घरी येईल, याची ते वाट पाहत असतात. घराबाहेर काय होईल, काही सांगता येत नाही. अशीच काहीशी घटना भोर तालुक्यात घडली. शेतकरी म्हशी घेऊन नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला. पण, तो परतला नाही. त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध केली. शेवटी त्या शेतकऱ्याचे कपडे आणि चप्पल बंधाऱ्याच्या बाजूला दिसले आणि कुटुंबीयांच्य मनात शंकेची पाल चुकचुकली.
शेतकऱ्याने भोर तालुक्यातील गुंजवणी नदीवरील सांगवी घोरेपडळ येथील बंधाऱ्यावर गोठ्यातील म्हशींना पाणी पाजण्यासाठी नेले होते. शेतकऱ्याचा नदीवरील बंधाऱ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शंकर विठोबा कचरे (वय 54) रा. कुरंगवडी असं त्यांचं नाव आहे. मंगळवारी शंकर कचरे यांनी नेहमी प्रमाणे गोठ्यातील दहा ते बारा म्हशींना घेऊन सांगवी-घोरेपडळ गावाजवळील गुंजवणी नदीच्या बंधाऱ्यावर गेले.
सायंकाळी सर्व म्हशी गोठ्याकडे निघून आल्या. परंतु शंकर कचरे न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरु केला. परंतु ते सापडले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे पुतणे नवनाथ कचरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा शोध घेतला. बंधाऱ्याच्या काठावर त्यांचे कपडे आणि चप्पल अढळली. यावरुन पाण्यात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळला.
याबाबत पोलीस पाटील नरेश शिळीमकर यांनी राजगड पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. याबाबत मृताचा मुलगा अनिल शंकर कचरे वय 27 यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश कुदळे करत आहेत.
घरून गेलेला व्यक्ती नेहमीप्रमाणे वेळेवर घरी आला नाही. तर मनात शंकेची पाच चुकचुकते. शंकर कचरे सायंकाळी घरी आले नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडले. आता म्हशी आल्या. पण, शंकर का आले नाही, याची चिंता त्यांना वाटू लागली.