Indapur Child Death : चालत्या ट्रॅक्टरमधून ऊस खेचताना तोल गेला, चाकाखाली आल्याने सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

या मुलाने चालत्या ट्रॉलीमधील ऊस मोडलाही होता. मात्र ऊस मोडताच त्याचा तोल गेला आणि तो ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीखाली पडला.

Indapur Child Death : चालत्या ट्रॅक्टरमधून ऊस खेचताना तोल गेला, चाकाखाली आल्याने सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू
ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडल्याने सात वर्षाच्या मुलाचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 3:39 PM

इंदापूर : चालत्या ट्रॅक्टरमधून ऊस खेचायला गेलेल्या सात वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरच्या मागच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील अंथूर्णे येथे घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जुन्या शेळगाव रस्त्यावर अंथूर्णे येथील सत्संग भवनसमोर घडली. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. वालचंदनगर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. चालत्या ट्रॅक्टरमधून ऊस खेचणे मुलाच्या जीवावर बेतले आहे.

काय घडले नेमके?

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शेळगावकडून अंथूर्णेच्या दिशेने ऊसाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच 16 एएम 6506) निघाला होता. ट्रॅक्टर अंथूर्णे गावाच्या मध्यवस्तीतून जात असतानाच मयत मुलगा हा ट्रॅक्टरमधून ऊस काढण्यासाठी ट्रॅक्टरच्या मागे पळत होता.

या मुलाने चालत्या ट्रॉलीमधील ऊस मोडलाही होता. मात्र ऊस मोडताच त्याचा तोल गेला आणि तो ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीखाली पडला. दुर्दैवाने ट्रॉलीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

आईचे निधन झाल्याने आजीकडे राहत होता मुलगा

मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. मयत मुलाच्या आईचे निधन झाले आहे. त्याला एक भाऊ देखील आहे, मात्र त्याला बोलता येत नाहीत. आई नसल्यामुळे मुलगा अंथूर्ण येथे आजीकडे राहत होता. मुलाचे वडिल भटकंती करुन कुटुंबाची उपजीविका करतात.

बुलढाण्यात विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

शेतात आईसोबत फिरायला गेलेली मुलगी पाणी काढताना विहिरीत तोल जाऊन पडली. यावेळी तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतलेल्या आईचा बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलगी विहिरीची कडा पकडून राहिल्याने ती वाचली आहे.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.