Pune Student Beating : शिक्षकांवर शेरोशायरी केली, संतापलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

आळे येथील ज्ञानमंदिर ज्युनिअर कॉलेज येथे शनिवारी सकाळी काही मुलांच्या घोळक्यातील एका मुलाने शिक्षकांना पाहून शेरोशायरी केली. याबाबत कोणतीही शहानिशा न करता शिक्षकाने एका विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला मारहाण करत लाथा-बुक्क्या घातल्या.

Pune Student Beating : शिक्षकांवर शेरोशायरी केली, संतापलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण
चोर समजून व्यक्तीला मारहाणImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 2:03 PM

पुणे : शिक्षकावर शेरोशायरी केली म्हणून अकरावीच्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील आळेफाटा येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आळे येथील ज्ञानमंदिर ज्युनुअर कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पालक वर्गातून शिक्षकाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणाची दखल घेत कॉलेज प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी तात्काळ बैठक बोलावली आहे. आता कॉलेज प्रशासन आरोपी शिक्षकाविरोधात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण?

आळे येथील ज्ञानमंदिर ज्युनिअर कॉलेज येथे शनिवारी सकाळी काही मुलांच्या घोळक्यातील एका मुलाने शिक्षकांना पाहून शेरोशायरी केली. याबाबत कोणतीही शहानिशा न करता शिक्षकाने एका विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला मारहाण करत लाथा-बुक्क्या घातल्या.

यावेळी पीडित विद्यार्थी आपली काही चूक नसल्याचे शिक्षकाला सांगत होता. तसेच मारहाण करु नये अशी विनवणी करत होता. मात्र शिक्षकाने काहीही ऐकून न घेता विद्यार्थ्याला मारहाण करतच राहिला.

हे सुद्धा वाचा

मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

तेथे उपस्थित एका विद्यार्थ्याने मारहाणीची घटना मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षकाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आळेफाटा पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान, आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलीस घटनेचा तपास करत आहेत. तपासाअंती गुन्हा दाखल करण्यात येईल.

आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.