Saswad Murder : सासवडमधील दोन भिक्षुकरींच्या हत्येप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल
सासवड येथील भोंगळे वाईन शेजारी पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप या अंडा बुर्जी हॉटेल चालकाने 23 मे रोजी कचरा वेचक भिक्षुकरींना बेदम मारहाण करुन त्यांच्या आंगावर उकळतं पाणी टाकलं. या हत्याकांडातील मयत भिक्षेकरी हा पप्पू जगताप यांच्या अंडा बुर्जी हॉटेल जवळ असलेल्या ओसरीवर दररोज बसत होते. याचाच राग मनात धरून पपू जगताप यांनी या तिघांना सर्वप्रथम काठीने मारहाण केली.
पुणे : पुण्यातील सासवड परिसरामध्ये दोन भिक्षुकरींच्या हत्ये (Murder)प्रकरणी आरोपीवर गुन्हा (Fir) दाखल करण्यात आला आहे. पप्पू जगताप असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पप्पू जगताप हा अंडा बुर्जीचे हॉटेल चालवतो. जगतापने 23 मे रोजी कचरा वेचणाऱ्या तिघांवर गरम उकळतं पाणी टाकलं होतं. यात दोन भिक्षुकरींचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी (Injured) असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पप्पू जगताप सध्या फरार आहे.
आधी बेदम चोपलं, मग अंगावर उकळतं पाणी टाकलं
सासवड येथील भोंगळे वाईन शेजारी पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप या अंडा बुर्जी हॉटेल चालकाने 23 मे रोजी कचरा वेचक भिक्षुकरींना बेदम मारहाण करुन त्यांच्या आंगावर उकळतं पाणी टाकलं. या हत्याकांडातील मयत भिक्षेकरी हा पप्पू जगताप यांच्या अंडा बुर्जी हॉटेल जवळ असलेल्या ओसरीवर दररोज बसत होते. याचाच राग मनात धरून पपू जगताप यांनी या तिघांना सर्वप्रथम काठीने मारहाण केली. मारहाणीत निपचीत पडलेले भिक्षेकरित अजून कसे गेले नाहीत. म्हणून पपू जगताप याने त्याच्या हॉटेलमधील गरम पाणी या तिन्ही भिक्षेकरीच्या अंगावर ओतलं. यात दोन भिक्षेकरी पूर्णपणे भाजून निघाले आणि यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर एक गंभीररीत्या भाजलेल्या भिक्षुकरीवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
पोलिसांच्या भूमिकेवर संशय
ज्या ठिकाणी हे हत्याकांड झाले त्या ठिकाणापासून सासवड पोलिस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र पोलिसांनी ह्या घटनेकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे या हत्याकांडात पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेतला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात पुरंदरच्या आमदारांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला होता. इथले पोलिस ठाणे कॉंग्रेसचे व्यक्ती चालवत असल्याचं आणि त्यातून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. (Accused charged with murder of two beggars in Saswad Pune)