Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे चाकण पोलिस ठाण्यातून पलायन

शरीराने सडपातळ असलेला कुणाल लॉकअपच्या दोन्ही गजांमधून बाहेर पडला अन काही कळायच्या आत त्याने धूम ठोकली. कुणाल हा पसार झाल्याचं समजताच पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तिथूनच काही अंतरावर असणाऱ्या घरात तो होता.

Pune Crime : घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे चाकण पोलिस ठाण्यातून पलायन
घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे चाकण पोलिस ठाण्यातून पलायन
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 10:15 PM

पुणे : पुण्यातील चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी (Burglary) आणि चोऱ्या करणाऱ्या अटकेतील चोरट्याने चक्क लॉकअपमधून धूम ठोकली. तो लॉकअप मधून कसा बाहेर आला, याचं प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस स्टेशन (Chakan Police Station)मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी फरार झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल बाळू वीर असे आरोपीचे नाव आहे. आज सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास सगळे पोलीस त्यांच्या कामात दंग होते. तर पोलीस ठाण्यातील अंमलदार हे लघुशंकेसाठी बाहेर गेले होते. (Accused of burglary and theft escaped from Chakan police station and arrested)

लॉकअपच्या गजांमधून पसार झाला चोरटा

शरीराने सडपातळ असलेला कुणाल लॉकअपच्या दोन्ही गजांमधून बाहेर पडला अन काही कळायच्या आत त्याने धूम ठोकली. कुणाल हा पसार झाल्याचं समजताच पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तिथूनच काही अंतरावर असणाऱ्या घरात तो होता. या घरातून पळ काढायच्या तो तयारीत होता. पण बाहेर चाकण पोलिसांनी सापळा रचून ठेवला असेल याची त्याला कल्पनाच नव्हती. तो पावणे दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडला अन् पुन्हा अटकेत आला. पण या घटनेमुळे पोलीस स्टेशनमधील लॉकअपबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

उल्हासनगरमध्ये धूम स्टाईलने मोबाईल चोरी करणारा जेरबंद

उल्हासनगरमध्ये धूम स्टाईलने मोबाईल चोरून पळणाऱ्या चोरट्याला पीडित आणि पोलिसांना पाठलाग करुन पकडण्यास यश आले आहे. जाफर गुलाब इराणी असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 1 मध्ये राहणारे कैलास सुखवानी हे रविवारी सकाळी बिर्ला गेट परिसरात उभे होते. यावेळी काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल खेचून शहाडच्या दिशेने धूम ठोकली. यावेळी सुखवानी यांनीही त्याचा पाठलाग केला. हा चोरटा शहाड स्टेशनच्या परिसरात येताच ट्रॅफिकमुळे त्याचा वेग मंदावला. त्यामुळे सुखवानी यांनी आरडाओरडा करताच शहाड चौकीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. मोबाईल चोरल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच या चोरट्याला पकडण्यात पोलिसांच्या समयसूचकतेमुळे यश आले आहे. (Accused of burglary and theft escaped from Chakan police station and arrested)

इतर बातम्या

Video | दानपेटीतील रक्कम चोरता आली नाही म्हणून दानपेटीच पळवली, मालेगावातील महादेव मंदिरात खळबळ

Ulhasnagar Theft : मोबाईल खेचून पळाला, अन पोलिसांच्या जाळ्यात सापडला!, उल्हासनगरात चोरटा अटकेत

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.