पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई! दोन तरुण ताब्यात, तिसरा पळाला

पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच ATS ने मोठी कारवाई केली आहे. एटीएसने पुण्यात दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.

पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई! दोन तरुण ताब्यात, तिसरा पळाला
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 11:00 PM

पुणे : पुण्यातून एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच ATS ने मोठी कारवाई केली आहे. एटीएसने पुण्यात दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. पुणे पोलीस आणि ATS कडून ही संयुक्त करवाई करण्यात आली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच एक आरोपी फरार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने काल मध्यरात्री दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं. एटीएसला दोन्ही तरुणांच्या लॅपटॉपमध्ये संशयास्पद माहिती आढळली आहे. त्यामुळे देशविरोधी कारवाई केल्याच्या संशयावरून दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित तीनही संशयित आरोपी हे पुण्यातील कोंडवा परिसरात वास्तव्यास आहेत. पण ते कोथरुडमध्ये सारखे ये-जा करायचे. कोथरुड येथून ते काहीतरी संशयास्पद काम करत असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यातून एटीएस आणि कोथरुड पोलीस यांनी संयुक्त विद्यमाने संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी एकजण फरार झाला. तर दोघांना ताब्यात घेण्यात आलं. आरोपींच्या लॅपटॉपमध्ये संशयास्पद डेटा आढळला असल्याची माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस आणि एटीएसकडून दोन्ही आरोपींची सकाळपासून चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पण या प्रकरणी तपासातून नेमकी काय माहिती समोर आली ते समजू शकलेलं नाही. तसेच आरोपींना चौकशीनंतर सोडलं जातं की त्यांना अटक केली जाते, याबाबतही माहिती सध्या तरी समजू शकलेली नाही.

पुण्यात एटीएसकडून याआधीदेखील अशीच कारवाई करण्यात आली होती. एटीसएसने गेल्यावर्षी मे महिन्यात पुण्यातून एका तरुणाला अटक केली होती. आरोपी हा लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. त्याला पुण्यातील दापोडी येथून अटक करण्यात आली होती. संबंधित तरुण हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात आला होता. तो दहशतवद्यांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली होती.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.