AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पुण्यात जुन्या वादातून ज्यूस सेंटरच्या मालकावर जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यात आल्यानंतर तो शिवाजीनगरमधील एका लॉजमध्ये राहत असे. यावेळी तो कणसे यांच्या ज्यूस सेंटरजवळ असलेल्या दुकानाबाहेर दिवसभर बसून राहत असे. यावरुन कणसे त्याला सुनावत असत. याच कारणातून दोघांमध्ये वादावादी झाली होती. याचा राग मनात धरुन आरोपीने कणसे यांच्या डोक्यात हातोडा घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Video : पुण्यात जुन्या वादातून ज्यूस सेंटरच्या मालकावर जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
पुण्यात जुन्या वादातून ज्यूस सेंटरच्या मालकावर जीवघेणा हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 5:52 PM

पुणे : शिवाजीनगर परिसरात एका ज्यूस सेंटरच्या मालकावर जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. आरोपीने लोखंडी हातोडीने ज्यूस सेंटरच्या मालकाच्या डोक्यावर हल्ला केला. गुन्ह्याचा थरार ज्यूस सेंटरसमोर असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने 72 तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. बालाजी शंकर बनसोडे (36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तर हेमंत राजेंद्र कणसे असे हल्ला करण्यात आलेल्या पीडिताचे नाव आहे. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. बालाजीवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. (Attack on juice center owner in Pune due to old dispute, incident captured on CCTV)

जुन्या वादातून डोक्यात हातोडा घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

शिवाजीनगरमध्ये शिवाजी पूलाखाली हेमंत कणसे यांचे स्वामी समर्थ ज्यूस सेंटर नावाचे दुकान आहे. आरोपी बालाजी बनसोडे हा मूळचा सोलापूरमधील असून पुण्यात कामानिमित्त आला होता. पुण्यात आल्यानंतर तो शिवाजीनगरमधील एका लॉजमध्ये राहत असे. यावेळी तो कणसे यांच्या ज्यूस सेंटरजवळ असलेल्या दुकानाबाहेर दिवसभर बसून राहत असे. यावरुन कणसे त्याला सुनावत असत. याच कारणातून दोघांमध्ये वादावादी झाली होती. याचा राग मनात धरुन आरोपीने कणसे यांच्या डोक्यात हातोडा घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूचे लोक धावत आल्याने तो घटनास्थळावरुन पळून गेला. आरोपी बालाजी सध्या कर्वेनगरमध्ये राहत असून तेथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. बालाजी बनसोडेवर सोलापूरमध्ये हत्येचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, मारामारी यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच तो सोलापूरमधून पुण्यात आला होता. (Attack on juice center owner in Pune due to old dispute, incident captured on CCTV)

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.