Avinash Bhosale : अविनाश भोसलेंना सीबीआय कोठडी की दिलासा?, सीबीआय कोर्टात आज निर्णय

सोमवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता सीबीआय रिमांड मागण्यात आलेली.

Avinash Bhosale : अविनाश भोसलेंना सीबीआय कोठडी की दिलासा?, सीबीआय कोर्टात आज निर्णय
पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडीImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 5:56 AM

मुंबई : पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले सीबीआय कोठडीत जाणार की दिलासा मिळणार? याचा निर्णय आज होणार आहे. सीबीआय कोर्ट याबाबत आज निकाल देईल. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. पुण्याचे व्यवसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांना सीबीआयने (CBI)अटक केली होती.येस बँक-डीएचएफएल (YES bank-DHFL) फसवणूक प्रकरणी त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात अविनाश भोसले यांच्या सीबीआय रिमांडवर दोन्ही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली आहे.मात्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून आज दुपारी बाराच्या सुमारास न्यायालयात या संदर्भात निर्णय देण्यात येईल. बहुचर्चित येस बँक-डीएचएफएल प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंवर गैरव्यवहाराचा आरोप आहे. त्यांनी गैरव्यवहारातील 292 कोटी रुपये इतरत्र वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अविनाश भोसले यांचे अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचंही सांगितलं जातंय.

आज निर्णय!

सोमवारी अविनाश भोसले यांच्या आरोपांप्रकरणी युक्तिवाद पूर्ण झाला आहे. वेळेअभावी न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेत निकाल राखून ठेवला होता. सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून अटक केलेली. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना 27 मे रोजी हजर करण्यात आलं होतं.

दरम्यान आज दुपारी 12 वाजता मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडेल. यात अविनाश भोसले यांना दिलासा मिळतो की त्यांची रवानगी सीबीआय कोठडीत होते हे पाहणं महत्वाचंय.

हे सुद्धा वाचा

सीबीआय रिमांडला विरोध

अविनाश भोसलेंतर्फे सोमवारी सीबीआय रिमांडला विरोध करण्यात आला होता. कोर्टाने अविनाश भोसले यांना 27 मे रोजी नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले. दरम्यान सोमवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता सीबीआय रिमांड मागण्यात आलेली. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केलाय.

अविनाश भोसलेंवर काय आरोप?

  1. बहुचर्चित येस बँक-डीएचएफएल प्रकरणातील गैरव्यवहाराचे 292 कोटी रुपये इतरत्र वळवल्याचा आरोप
  2. अविनाश भोसलेंना 68 कोटी रुपये सल्ला शुल्क म्हणून मिळाल्याप्रकरमी तपास सुरु
  3. मार्च 2020 मध्ये सीबीआयकडून गुन्हा दाखल
  4. गैरव्यवहारातील रक्कम बांधकाम व्यवसायिकांच्या मदतीने इतरत्र वळवल्याचा सीबीआयला संशय
  5. 30 एप्रिलला बांधकाम व्यवसायिकांच्या ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी
  6. त्यात अविनाश भोसले यांच्या पुण्यातील एबीआयएल कंपनीशी संबंधीत ठिकाणांचाही समावेश

अविनाश भोसले कोण आहेत?

  1. रिक्षावाला ते इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास
  2. नगर जिल्ह्यातील संगमनेरचे असलेले अविनाश भोसले पुण्यात आले आणि तिथं त्यांनी जम बसवला.
  3. राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे
  4. कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे ते मालक
  5. अनेक राजकीय नेत्यांशी चांगले संबंध
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.