Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदापूरमधील भिशी फसवणूक आकडा तब्बल 200 कोटींवर, शेकडो सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक

गेल्या चार पाच वर्षापूर्वी इंदापूर शहरात भिशी चालवणारे अनेक जण उदयास आले. या भिशी चालकांनी कुठलाही कायदेशीर आधार नसताना, कुठला टॅक्स नाही, की अधिकृत रेकॉर्ड नसताना रोखीत लिलाव भिशी सुरू केल्या. यात हातगाडी, टपरी, पथारी, मोलकरीण, भाजी विक्रेते असे अत्यंत किरकोळ छोटे व्यापारी ते बड्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना सामील केले.

इंदापूरमधील भिशी फसवणूक आकडा तब्बल 200 कोटींवर, शेकडो सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक
इंदापूरमधील भिशी फसवणूक आकडा तब्बल 200 कोटींवर
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 11:46 PM

इंदापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील विशाल फटे प्रकरण ताजे असतानाच आता पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील भिशीचे प्रकरण पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरात सर्वात मोठी आर्थिक फसवणूक घोटाळा समोर आला असून लिलाव भिशीच्या माध्यमातून शेकडो जणांची आतापर्यंत 200 कोटींहून अधिक आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. इंदापूर शिवसेना वतीने हा आर्थिक घोटाळा समोर आणला असून या भिशीमध्ये फसवणूक झालेल्यांना त्यांची रक्कम परत मिळवेपर्यंत शिवसेना मदत करण्याची हमी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

गेल्या चार पाच वर्षापूर्वी इंदापूर शहरात भिशी चालवणारे अनेक जण उदयास आले. या भिशी चालकांनी कुठलाही कायदेशीर आधार नसताना, कुठला टॅक्स नाही, की अधिकृत रेकॉर्ड नसताना रोखीत लिलाव भिशी सुरू केल्या. यात हातगाडी, टपरी, पथारी, मोलकरीण, भाजी विक्रेते असे अत्यंत किरकोळ छोटे व्यापारी ते बड्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना सामील केले. किरकोळ छोटे व्यापारी यांची वेगळी भिशी तर बड्या व्यावसायिकांची वेगळी भिशी केली. यात मोठ्या भिशीची रक्कम 50 लाख ते कोटी-दोन कोटींची तर किरकोळ व्यापाऱ्यांची 5-10 लाखांची व 10 लाखांच्या खाली किरकोळ छोटे व्यापारी होते.

लिलाव भिशी नेमकी कशी चालवली गेली?

भिशी चालकांनी भिशी ही काही ठराविक लोकांमध्ये सुरू केली. ही एक साखळी पद्धत आहे. यात भिशीमध्ये 20 किंवा त्यापेक्षा अधिक सभासद केले गेले. यात प्रत्येकाने किती रक्कम द्यायची ही अगोदरच ठरविली गेली. प्रत्येक सभासदाने ठरविल्याप्रमाणे (यात प्रत्येकी सात दिवस किंवा एक महिना) दिवसांनी प्रत्येक सभासदांनी ठरविलेली रक्कम भिशी चालकाकडे नियमित रोख स्वरुपात भरायची. भिशी चालकाने ती सर्व सभासदांकडून ती रक्कम गोळा करायची. नंतर या रक्कमेचा लिलाव केला जातो. ज्याला पैशाची गरज असेल तो हा लिलाव वाढवत जातो. जर त्याला भिशी परवडत असेल तर तो जास्तीचा लिलाव करून ती भिशी उचलतो. त्यानंतर त्या भिशीचा लिलाव जेवढा रुपयांचा झाला आहे. तेवढे रुपये कट करून त्याला ती सर्व सभासदांची जमलेली रक्कम दिली जाते. यात राहिलेल्या रक्कमेचे व्याज सगळ्यांमध्ये वाटून घेतात. असे प्रत्येक महिन्याला/ आठवड्याला 1 सभासद भिशी घेत असतो. हे सर्व अनधिकृतपणे असते.

नेमकी कशी झाली आर्थिक फसवणूक?

भिशीचे विविध प्रकार असले तरी दोन प्रकारच्याच भिशी प्रसिद्ध आहेत. कमिशन बेसीस अर्थात लिलाव भिषी व बिन व्याजी भिशी या दोन पैकी लिलाव बेसीस भिशी अत्यंत जोखिमपूर्ण व लाभदायकही ठरते. त्यामुळे अनेकजण रिस्क स्वीकारून या भिशीत उतरतात. दरम्यान, शहराच्या बाजारपेठेतील जवळपास प्रत्येक व्यापारी पुकार भिशीच्या विळख्यात अडकलेला आहे. एक भिशी चालक किंवा मध्यस्थी हा एका वेळी दहा ते पंधरा पुकार भिशी चालवित असतात. बहुतांश वेळा भिशी मध्येच त्या बंद पाडायच्या किंवा बंद पडल्यानंतर असे भिशी चालक अर्ध्यातून भिशी बुडवून फरार झाले आहेत. त्यामुळे यात शेकडो जणांची कोट्यवधीची आर्थिक फसवणूक झाली.

भिशी चालकानी विकत घेतल्या नातेवाईकांच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता

भिशी चालकांनी यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा मिळवत स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावावर शहरात व तालुक्यात मालमत्ता केल्या आहेत. स्वतः भिशी चालक व त्यांचे नातेवाईक सध्या अलिशान गाड्या घेऊन फिरत आहेत. ज्या सर्वसामान्य लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून लाखो रुपये त्यांच्या हातात दिले ते भिशी चालक आता या सर्वसामान्य लोकांना दमदाटी करीत असल्याचे इंदापूरमध्ये चित्र आहे. प्रसंगी पोलीस ठाण्यात खोट्या केसेस दाखल करून सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण त्यांनी करून ठेवले आहे. त्यामुळे या भिशी चालकांकडे पैसे मागण्यासाठी कोणीच धाडस करीत नव्हते. परंतु इंदापूर शहरातील शिवसेना पक्ष आता पुढे सरसावल्याने या प्रकरणातील आर्थिक घोटाळा समोर आला असून यासंदर्भात शिवसेनेचे शहराध्यक्ष मेजर महादेव सोमवंशी यांनी पुढाकार घेतला असून इंदापूर पोलिस ठाण्यात यासंदर्भात पंधरा ते वीस चालकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. जोपर्यंत इंदापूर शहरातील आर्थिक फसवणूक झालेल्या नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळेपर्यंत हा डीसी चालकांविरुद्धचा लढा सुरूच ठेवणार असल्याचं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Bhishi fraud in Indapur is over 200 crores, Financial fraud of hundreds of commoners)

इतर बातम्या

Pune Kidnapping Case Balewadi : सिद्धार्थ जाधवचीही डूग्गू परतल्यानंतर पोस्ट…पुणे पोलिसांचे आभार मानत म्हणाला…

धक्कादायक ! साताऱ्यात माजी सरपंचाची वनरक्षक दाम्पत्याला मारहाण, घटनेत गर्भवती महिला वनरक्षक जखमी

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.